रोहा

सायकल चालविता येणे  म्हणजे स्वतःचा तोल सावरणे.तोल सावरायला शिकल्यात कि तुम्हीही सर्व जणी उत्तमरीत्या सायकल चालवत आपापल्या शाळेत जात चांगले शिक्षण घ्याल.सायकल चालविताना सांभाळलेला तोल हा जिवनातील पुढील वाटचालीत हि सांभाळलात तर नक्कीच यशस्वी व्हाल.  आज मुबंई विभागाचा दहावीचा निकाल लागला कि त्यामध्ये माझ्या कोकणातील मुली ह्या अव्वल असतात.आज खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्यासाठी कोकण वगळता राज्यातील अन्य सर्व भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आलेले दिसतात.खासदार म्हणून त्यांना सहकार्य हे करत असतो.तेव्हाची आय.सी.एस आताची आय. ए. एस परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉ. सी. डी. देशमुख रोह्याचे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे.असे असुनही आज आपल्या येथील विद्यार्थ्यांची टक्का लोकसेवा आयोगाच्या परिक्षे मध्ये अल्प प्रमाणात दिसत आहे.रोहा सह कोकणातील विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी तयारी करावी दिल्लीत खासदार म्हणून त्यांना लागणारी सर्व मदत मि करणार असे मार्गदर्शन पर आश्वासन खा. सुनील तटकरे यांनी दिले. त्यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त रोहात विद्यार्थिनींना आज सायकल वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी रोहा नगरपरिषदेच्या जेष्ठ नागरिक सभागृहात आयोजित सभेत उपस्थित विद्यार्थ्यांनी व जनसमुदायस संबोधित करताना ते बोलत होते. सुनील तटकरे प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित या कार्यक्रम प्रसंगी आ. अनिकेत तटकरे,प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुका प्रमुख विनोद पाशीलकर ,सभापती राजश्री पोकळे,महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा दिपिका चिपळूणकर,उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर,गटनेते महेंद्र गुजर,महेश कोलाटकर,राजेंद्र जैन,नंदु म्हात्रे,शिवराम शिंदे,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
खासदार सुनील तटकरे यांचे वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस व सुनील तटकरे प्रतिष्ठान च्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.शालेय साहित्य,संगणक,क्रिडा स्पर्धा व साहित्य वाटप,वक्तृत्व,निबंध स्पर्धा आदी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले आहेत. या वर्षी कोकणचे नेते सुनील तटकरे यांचे वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील 3 किलोमीटर अंतराचे वर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनीना सायकल चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. अनिकेत तटकरे यांनी करताना विद्यार्थिनींना सायकल मिळाल्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल व हा वेळ त्यांना अभ्यासा करीता उपयुक्त ठरेल. पुढील वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थी बांधवांचे साठी हि असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असे सांगितले. तालुक्यातील 97 विद्यार्थिनींना या वेळी चांगल्या दर्ज्याच्या सायकल वाटप करण्यात आल्या.

अवश्य वाचा