जेएनपीटी दि ११

उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पबाधित ११ ग्रामपंचायतीना थक्कीत असणारा मालमत्ता कर वाटप करण्यासाठी जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून बंदराचे चेअरमन संजय शेठी यांनी पुढाकार घेतला असून या ११ प्रकल्पबाबित ग्रामपंचायतीने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला तर थकीत मालमत्ता कराचे वाटप करण्यास जेएनपीटी बंदर  निश्चित कटिबद्ध राहणार असा विश्वास जेएनपीटी बंदराचे व्यवस्थापक अधिकारी जयवंत ढवळे यांनी व्यक्त केला आहे.

उरण तालुक्यातील महालण विभागातील नवीन शेवा,हनुमान कोळीवाडा, जसखार ,सोनारी,करळ,फुंडे,जासई,नवघर, पागोटे,चिर्ले,धुतूम आदि ११ ग्रामपंचायतीची जमिन सिडकोच्या माध्यमातून जेएनपीटी बंदराच्या उभारण्यासाठी संपादित केली.मात्र १९८४ पासून या ग्रामपंचाययतींचा करोडो रुपयांचा थकीत मालमत्ता कर देण्याचे टाळले. त्यामुळे या ग्रामपंचायतींना रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण झाल्या, परिणामी सदर ११ ग्रामपंचायतीनी जेएनपीटी बंदर, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद,कोकण आयुक्त,मंत्रालय , न्यायालयात टप्प्याटप्प्याने धाव घेतली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार जेएनपीटी बंदराच्या व्यवस्थापनाने जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीना काही अंशी थकीत मालमत्ता कर देण्याचे मान्य केले.आणि मालमत्ता कराची रक्कम बँकेत जमा केली.परंतू बँकेतील तसेच जेएनपीटी बंदराकडे थकीत असणारी उर्वरीत मालमत्ता कराची रक्कम मिळण्यास पुन्हा अडचणी येऊ लागल्याने सदर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास ग्रामपंचायतीना अडचणी निर्माण झाल्या, एकंदरीत मालमत्ता करा अभावी सदर ११ ग्रामपंचायत हद्दीतील विकास खुंटला.

त्यामुळे यांचे गांभिर्य ओळखून महालण विभागातील जेएनपीटी प्रकल्पबाधित ११ ग्रामपंचायतीने जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामूशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून जेएनपीटी प्रकल्पबाधित ११ ग्रामपंचायतीना जेएनपीटी बंदराच्या व्यवस्थापनाने थकीत मालमत्ता कराचे वाटप करण्याचे जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय शेठी यांना सुचित केले असता बंदराचे चेअरमन संजय शेठी यांनी समितीचे अध्यक्ष तथा सरपंच दामूशेठ घरत यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला होता.

त्या अनुषंगाने जेएनपीटी बंदराचे व्यवस्थापक अधिकारी जयवंत ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ( दि११ ) प्रशासकीय भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जेएनपीटी बंदराचे व्यवस्थापक अधिकारी जयवंत ढवळे यांनी जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीना थकीत मालमत्ता कराचे वाटप करण्यात येणार आहे.तरी यासंदर्भात सदर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद दर्शवून जेएनपीटी बंदराला सहकार्य करावे आणि थकीत मालमत्ता कराच्या माध्यमातून रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे सुचित केले.

यावेळी जेएनपीटी प्रकल्पबाधित ११ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष तथा जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामूशेठ घरत यांनी यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन निर्णय कळविण्यात येईल असे अधिकाऱ्याना सांगितले .यावेळी जेएनपीटी बंदराच्या अधिकारी मनिषा जाधव, देशमुख अण्णा,सोनारी सरपंच पुनम महेश कडू, मेघश्याम कडू,फुंडे सरपंच जयवंती परशुराम म्हात्रे, उपसरपंच प्रशांत काशिनाथ भोईर,जासई संतोष घरत,पाणजे हरेश भोईर,डोंगरी सरपंच निलेश घरत,धुतूम शरद पाटील, हनुमान कोळीवाडा सरपंच परमानंद कोळी ,करळ सरपंच विश्वास तांडेल, पागोटे सरपंच अँड भार्गव पाटील,फुंडे गाव अध्यक्ष परशुराम म्हात्रे उपस्थित होते.

अवश्य वाचा