जेएनपीटी दि १०

बेकायदेशिर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने दोन आरोपींना उरणच्या चिर्ले येथून अटक केली आहे. सेराज रफिक खान आणि गोविंद लालजित राजभर असे या दोन आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश तांबे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई गन्हे शाखेच्या पोलिसांनी दि९ चिर्ले गावाजवळील गंगा रसोई हॉटेलच्या परिसरात सापळा लावला होता. या वेळी सेराज रफिक खान याच्याकडे इटली बनावटीचे पिस्तूल आढळून आले.

पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला गोविंद राजभर यांने हे पिस्तूल विकले असल्याचे सांगितले. पोलिसांनी जासई परिसरात गोविंद राजभरचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले. त्याने सेराज खानला पिस्तूल विकल्याचे कबूल केले. दोघांविरूद्ध उरण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५, २५ सह पोलिस कायदा कलम  ३७(१),१३५ अन्वये गुन्हा नोंदण्यात आला आहे. त्या दोनही आरोपीना शुक्रवार दि१३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक एन.बी. कोल्हटकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश तांबे, संजय पवार आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पुढील तपास निलेश तांबे करत आहेत.

अवश्य वाचा