उरण

उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल रायगड जिल्हा परिषदेने घेत त्यांना आज रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  पुरस्कार मिळल्याबद्द गोपाळ पाटील  यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गोपाळ पाटील हे सतत सामाजिक कार्य करण्यासाठी धडपडणारे असे व्यक्तिमहत्व समजले जाते. त्यांनी येथील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यां मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खोपटा गावात जाण्यासाठी खाडीजवळ पायवाट करणे, करळ रेल्वे क्रॉसिंग खुला करणे, उरण शहरा बाहेरून बायपास रस्ता, नोकरभरती तसेच कोणाचे सामाजिक कार्यासाठी आंदोलन, मोर्चा असो त्यामध्ये सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल रायगड जिल्हा परिषदेने घेत त्यांना यावर्षीचा रायगड भूषण पुरस्कार जाहीर केला.

आज रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गोपाळ पाटील यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिप अध्यक्षा आदिती तटकरे, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील,जिप सदस्य विजय भोईर आदी अनेकांची उपस्थिती होती.

अवश्य वाचा