धाटाव ११ सप्टेंबर

    माझे नाव तटकरे आहे.तटबंदी मजबूत कशी करायची हे फक्त आणि फक्त मलाच माहित आहे.तुमच्या सारखे अनेक बंधु माझ्या सोबत आहेत,असा कटाक्ष टाकित अनेकांची नावे घेत खासदार सुनील तटकरे यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनेकांवर आपल्या नेहमीच्या आक्रमक राजकीय शैलित निशाना साधुन टिपणी केल्यामुळे याठिकाणी चांगलच हस्यकल्लोल उडाला.तुम्हाला हवे ते लिहा मला पाहिजे तेच मि करणार असे मिश्किल भाष्य सुद्धा त्यांनी केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीलाच आता जणु सुरुवात झाल्याचे चित्र आज धाटाव मधील भूमिपूजन  सोहोल्यासमयी पहावयास मिळाले.तर धाटाव मधील आजच्या दमदार भाषणाने मात्र सर्वाच्या भुवया चांगल्याच उंचावल्या. 

     आज धाटाव  येथील आदर्शवत यशवंत ग्रामपंचायतीच्या बहुउद्देशीय सामाजिक सभागृह कामाच्या भूमिपुजन सोहोळया समयी ते आक्रमकपणे बोलत होते.यासमयी विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिति तटकरे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,जिल्ह्या कार्याध्यक्ष मधुकर पाटिल,महिला अध्यक्षा दीपिका चिपलूनकर,सभापति राजेश्री पोकले,रोहा राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर,रामचन्द्र सकपाल,शंकर भगत रोहिदास पाशिलकर,प्रदीप देशमुख,सरपंच सुवर्णा रटाटे,उपसरपंच यशवंत रटाटे,नारायण धनवी,सुरेश महाबले,वसंत भोईर,रामा म्हात्रे,अमित मोहिते यांसह ग्रामपंचयतीचे सर्व सदस्य,सदस्या,विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

    दरम्यान धाटाव ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव करीत असताना भाईसाहेब पाशिलकर यांच्यानन्तर विजय मोरे,विनोद पाशिलकर यांनी ग्रामपंचायतिला एका उत्तुंग अशा वळणावर आणले असे सांगताना शिवराम रटाटे,यशवंत जाधव अशा जुन्या जाणत्या मंडळी बरोबर तत्कालीन काळापासून केलेल्या राजकीय कामांच्या आठवनिना मात्र उजाला द्यायला खासदार सुनील तटकरे विसरले नाहीत.त्यातच काही काळ महिला वर्गाने केलेल्या नेतृत्वाबद्दल महिलांचे कौतुक केले.ग्रामपंचायतीच्या कामाचा अंदाज अमाप आहे मात्र ग्रामपंचायातीची वास्तु सुसज्ज व देखनी वर्षभरात पूर्व होईल असा शब्द तटकरे यांनी दिला.

    ग्रामपंचायतीच्या वैभवपूर्ण देखण्या नव्या वास्तुत रिसेप्शन सेंटर व्हावे अशी सूचित केल्यानंतर खासदार झाल्यानतर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जाहिर केलेल्या खेलो इंडिया या कार्यकर्मान्तर्गत या खात्याचे मंत्री जयकिरन जज्जु यांची भेट घेऊन रोहा,अलीबाग व दापोली येथील क्रीडा संकुलात मल्टीपर्पज हॉल व अत्याधुनिक पद्धतिचे स्विमिंग पूलाची मागणी केली असता ती तत्वता मान्य झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.सरकार कुणाचेही असो,सरकारच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार,खासदारांपेक्षा आपल्या मतदार संघात विकासासाठी निधि देण्यासाठी नेहमीच प्राधान्य राहिल असे अभिवचन त्यांनी दिले.

    धाटाव ग्रामपंचयतीचे कार्यालय अतशीय चांगल्या पध्दतीचे आहे मात्र एकंदरीत येथील लोकसंख्या व विकासकामांची गति पाहता तटकरे साहेबांच्या म्याध्यमातून ही वीवीधलक्षी इमारत उभी राहत आहे याचा अभिमान ग्रामस्तांबरोबर मलाही आहे.आयुष्यात पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रात आल्यानंतर या गटातुन भाईसाहेबांच्या आशीर्वादाने रायगड जिल्ह्या परिषदेत काम करण्याची संधि मिळाली आणि येथील विकास कामाना निधि मंजूर करता आला.आजवर राज्य व जिल्ह्या पातळीवर ग्रामपंचायत विविध अभियानात बक्षीसपात्र ठरली मात्र यापुढे आणखी एक चांगल पाऊल पुढे टाकून राष्ट्रीय पातलीवरिल बक्षीस सुद्धा मिलावे अशि आशा व्यक्त केली करीत असताना ग्रामपंचायतिच्या या नवीन वास्तूमधे महिला बचत गटाला स्टॉलसाठी अथवा प्रशिक्षणासाठी हॉल उपलब्ध व्हावा असे मत व्यक्त करायला अदिति तटकरे विसरल्या नाहीत.

  दरम्यान आज झालेल्या भूमिपूजन सोहोल्यासमयी या वास्तुत 

ग्रामपंचयत कार्यालय

कर्मचारी प्रशासन कार्यालय,

सरपंच कार्यालय,

ग्रामविस्तार अधिकारी कार्यालय,ग्रामसभेसाठी सभागृह,तलाठी कार्यालय,कृषी कार्यालय,

ग्रामविस्तार अधीकारी यांचे निवासस्थान,अंगणवाडी केंद्र, तळमजला संपूर्ण बाजार १४ गाळे यासह स्वागत कक्ष अशी सुसज्ज वास्तु उभी राहणार आहे.

   याठिकाणी उपस्तित मान्यवारांच्या सन्मानाबरोबर विजयराव मोरे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी,मधुकर पाटील यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी तर विनोदभाऊ पाशिलकर यांची रोहा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकान्त मोरे यांनी केले.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास