मुंबई, सप्टेंबर 11,

पीएनबी हौसिंग फायनान्स (पीएनबीएचएफएल) या लोन अॅसेटच्या बाबतीत देशातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या व ठेवींच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हौसिंग फायनान्स कंपनीने मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये नवी शाखा सुरू केली आहे आणि पश्चिम भारतातील एकूण शाखांची संख्या 37 पर्यंत व भारतातील शाखांची संख्या 105 पर्यंत वाढवली आहे. ही शाखा प्रामुख्याने या सूक्ष्म बाजारातील मुदतठेवींच्या बाबतीत असणाऱ्या व्यवसाय संधीवर अधिक भर देणार आहे.

कंपनीच्या प्रादेशिक प्रमुखांबरोबरच, पीएनबी हौसिंगचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते नव्या शाखेचे उद्घाटन कण्यात आले. ही शाखा शॉप नं. 4, 5 व 6, तळमजला, वाडिया बिल्डिंग, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई 400001 येथे आहे.

पीएनबी हौसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले, “पीएनबी हौसिंगमध्ये आम्ही तंत्रज्ञान व फिजिकल टचपॉइंट्स यांच्या मदतीने, ग्राहकांसाठी सातत्याने मुदतठेवींसह सर्वोत्तम उत्पादने व सेवा सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. ब्रोकर कम्युनिटीसह विविध प्रकारच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी फोर्ट मोक्याच्या ठिकाणी आहे. शाखेच्या जाळ्याचा विस्तार केल्याने आम्हाला नव्या ग्राहकांना आमच्या वैविध्यपूर्ण रिटेल सेवा देणे आणि आमची प्रगतीला चालना देणे शक्य होणार आहे.”

पीएनबी हौसिंगचे पश्चिम भारतात आधीपासूनच वर्चस्व आहे. या भागात आणि प्रामुख्याने दक्षिण मुंबई या आर्थिक केंद्रामध्ये आणखी एका शाखेचा समावेश केल्याने हौसिंग फायनान्स व्यवसाय अधिक सक्षम होणार आहे.

पीएनबीएचएफएलने जून 30, 2019 पर्यंत अॅसेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये 88,333 कोटी रुपयांपर्यंत विस्तार केला, तर आर्थिक वर्ष 20 मधील पहिल्या तिमाहीत एकूण वितरण 7,634 कोटी रुपये होते. कंपनी सध्या सर्व शाखांमध्ये कार्यामध्ये सुसूत्रता आणत आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादकतेवर व प्रगतीवर लक्षणीय परिणाम होणार आहे.

पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेडविषयी

पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड (NSE: PNBHOUSING, BSE: 540173) ही पंजाब नॅशनल बँकेने प्रमोट केली आहे आणि ती नॅशनल हौसिंग बँकेकडे (एनएचबी) नोंदणीकृत हौसिंग फायनान्स कंपनी आहे. कंपनी 7 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. कंपनी रिटेल ग्राहकांना “हौसिंग व नॉन-हौसिंग लोन्स” देते. कंपनी रिअल इस्टेट विकसकांना बांधकाम फायनान्स लोन्सही देते. पीएनबी हौसिंग फायनान्स ही ठेवी स्वीकारणारी हौसिंग फायनान्स कंपनी आहे.

अवश्य वाचा