महाड-दि.११सप्टेंबर

महाड एमआयडीसी परिसरांतील दुषित साडपाणी वाहून नेणाNया नाल्या मध्ये मृत मासे आढळून आल्याने औद्योगिक वसाहती मध्ये खळबळ उडाली आहे.मुसळधार पावसाचा गैर फायदा घेत कांही रासायनिक कारखानदान दुषित पाण्यावर कोणतीही प्रक्रीया न करता थेट पाणी नाल्या मध्ये सोडत असल्याने नाल्यातील मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे.या बाबत महाड येथील प्रदुषण मंडळा कडून तपासणी करण्यांत येत असुन दोषी कारखानदारांवर कारवाई करण्यांत येईल असे एस.व्ही.औटी यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहती मधील पावसाचे सांडपाणी वाहून नेणाNया गटांतुन मृत मासे आढळून आल्याची माहिती प्रदुषण मंडळाच्या अधिकाNयांना मिळाली.घटनास्थळाची पाहाणी केल्या नंतर मुसळधार पावसामुळे पाण्याचे नमुने घेणे शक्य झाले नाही.त्याच प्रमाणे या वर्षी औद्योगिक वसाहती मधील नाले आणि गटारांची सफाई योग्य प्रकारे करण्यांत आलेली नसल्यामुळे गटांतुन रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.पावसाचा गैर फायदा कांही वंâपन्या घेत असल्याची माहिती प्रदुषण मंडळाला असुन त्या बाबत चौकशी करण्यांत येत असल्याचे सांगण्यांत आले.कारखान्यांतील पावसाचे पाणी सार्वजनिक गटारांमध्ये सोडले जाते आणि त्याचाच गैर फायदा रासायनिक कारखानदार घेत असल्याचे वांरवार तक्रार नागरिकांनी केल्या असुन त्या बाबत प्रदुषण नियंत्रण मंडळा कडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गेल्या दोन दिवसा पासुन पावसाचे प्रमाण वाढल्याने औद्योगिक वसाहती मधील सी झोन परिसरांतील गटारांमध्ये मेलेले मासे आढळून आले.या परिसरांमध्ये असलेले रासायनिक कारखानदान वारंवार दुषित पाणी सार्वजनिक नाल्यामध्ये सोडत असल्याची चचौ एमआयडीसी परिसरांतील कारखादारांमध्ये करण्यांत येत आहे.सी झोन मधील कारखान्यांतुन सोडण्यांत येत असलेल्या पाण्याचे नमुने घेण्यांत येणार असुन या परिसरांतील कारखानदार दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन महाड येथील प्रदुषण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी एस.व्ही औटी यांनी दिले.

अवश्य वाचा