महाड-दि.११ सप्टेंबर 

महाड तालुक्यांतील बिरवाडी मधील जुनी पेठ परिसरांमध्ये गणेशोत्सवाच्या नावाखाली जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेला मिळाली होती.महाड एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा अलिबाग रायगड यांच्या संयुक्त कारवाई मध्ये जुगार खेळणाNया नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यांत आला असुन त्यांंना अटक करण्यांत आली आहे.

गणेशोत्सवा मध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाल्या नंतर जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालया कडून गणेशोत्सवा मध्ये जुगार खेळणाNयांच्या विरोधांमध्ये कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यांत आले होते.संपुर्ण गणेशोत्सव काळा मध्ये पोलिसांची करडी नजर जुगार खेळणाNयांवर होती त्याच बरोबर पोलिस खबNयांकडून देखिल माहिती काढीत होते.रायगड स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेला त्यांच्या खबNया कडून मिळालेल्या माहिती वरुन बिरवाडी मध्ये जुनी बाजार पेठ असुन त्या परिसरांमध्ये गणेशोत्सवाच्या नावाखाली जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती.त्या नुसार पोलिसांनी बुधवारच्या मध्यरात्री छापा टाकुन नऊ जणांवर कारवाई केली.त्याच बरोबर जुगार खेळण्याचे साहित्य  आणि रोख २८ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.सर्व आरोपींच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यांत आला असुन पुढील कारवाई एमआयडीसी पोलिस करीत आहेंत.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास