मुरुड जंजिरा 

      मुरुड नगरपरिषदेने नुकतीच गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती.या सजावट स्पर्धेत विजय पैर यांनी केलेल्या सजावट हि अत्यंत जवलंत विषय वर आधारित होती.१६ व्या वर्षात आजची तरुण मुले व्यसनाधीन होतात.परंतु याच १६ व्या वर्षात ज्यांनी मोठे विक्रम करून जगात नाव कमावले अश्या व्यक्तींचे पराक्रम पेंटिंग व कागदाच्या साह्याने दाखवून तरुणांना प्रेरणादायी देखावा केल्याबद्दल विजय पैर याना नगरपरिषदेकडून तिसरा क्रमांक देण्यात आला होता.या सजावट स्पर्धेत त्यांना नगरपरिषदेकडून रोख रक्कम पाच हजार रुपये मिळाले आहेत.ती रक्कम त्यांनी स्वतःकडे न ठेवता सामाजिक भान राखत त्यांनी मिळालेली रक्कम कोल्हापूर -सांगली येथे पुरग्रस्तांच्या मदतीला देण्याचे ठरवले.सदरची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अर्पण करण्याचा त्यांनी निर्णय घेतल्याने पैर यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

     युवापिढीच्या देखाव्यासाठी त्यांचे वडील जनार्दन पैर व भाऊ अभय पैर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.सदरचा देखावा पहाण्यासाठी महाविद्यलयीन व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.गेली चार वर्ष पैर यांच्या सजावटीस प्रथम ते तृतीय क्रमांक मिळत आहे.

    याबाबत आपले विचार व्यक्त करताना विजय पैर यांनी सांगितले कि,सोळाव्या वर्षात असामान्य कर्तृत्व करणारे वीर अभिमन्यू,संत नायज्ञेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज,सचिन तेंडुलकर ये.आर.रहमान,आदी मंडळी आहेत.सद्य प्रस्थतीती आजची युवा पिढी इंटरनेट,मोबाईल,फेसबुक,व्हॉट अप ,सिगारेट,व मद्यप्राशनात वेळ व्यथित करीत आहे.युवा पिढीला प्रेरित करण्यासाठीच व त्यांच्यात उत्साह आणण्यासाठीच या सर्व मान्यवरांची माहिती आम्ही देखाव्यातून साकारली आहे.सदरचा देखावा व आमची कल्पना परीक्षकांना आवडली असून आम्हाला तृतीय क्रमांक मिळून आम्ही प्राप्त झालेली रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीला दिली आहे. 

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास