मुंबई 

डाेंबिवली ते सीएसएमटी लोकल प्रवासादरम्यान विसरलेली बॅग एका तरुणाने प्रमाणिकपणे परत केल्याची घटना समोर आली आहे. कल्पेश काशिराम पवार (२८, कफ परेड) असे बॅग परत करणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे.  डोंबिवली ते सीएसएमटी लोकल प्रवासादरम्यानप पत्रकार संदीप अंभोरे हे सोमवार, दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आपली महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख तीन हजार रुपये असलेली बॅग लोकलमध्येच विसरले होते. मस्जीद बंदर स्टेशवर उतरल्यानंतर त्यांच्या बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ लोकल पकडून सीएसएमटी स्टेशन गाठले. उभ्या असलेल्या दोन ते तीन ट्रेनच्या डब्यात शोध घेतला असता बॅग सापडली नाही. हरवलेल्या बॅगेचा शोध न लागल्यामुळे त्यांनी स्टेशन मास्टरांच्या कार्यालयाजवळ  बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडे हरवलेल्या बॅगेबाबत तक्रार दाखल करण्यासंबंधी विचारणा केली असता तेथील ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देत माहिती देण्यास टाळाटाळ केली. या कार्यालयात जाऊन बघा कोणी जमा केली असेल तर मिळेल, अन्यथा काहीही होणार नाही, असे सांगून आपली जबाबदारी झटकली. स्टेशन मास्टरांच्या कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी अशाप्रकारची बॅग कोणी जमा केली नसल्याचे सांगितले. दरम्यान, मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी कल्पेश काशिराम पवार यांनी बॅगेतून मोबाईल क्रमाक शोधून त्यांना बॅग सापडल्याचे सांगून बॅग परत केली. संदीप अंभोरे यांनी रोख रकमेसह कागदपत्रे असलेली बॅग परत मिळाल्यानंतर कल्पेश पवार यांचे आभार मानले.

 

अवश्य वाचा