दि. ११/९/२०१९ रोजी पनवेल शहर जिल्हा, पनवेल तालुका व रायगड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टला परवानगी देण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला व देशातील आर्थिक धोरणावर भाजाप / मोदी सरकार अपयशी ठरल्यामुळे निषेध करण्याबाबत व तातडीने आर्थिक धोरण सुधारण्यासाठी उपाय योजना करून देशाची अर्थ व्यवस्था मजबूत करावी अशे निवेदन पनवेल तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत, पनवेल तालुका अध्यक्ष महादेव कटेकर, पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, रायगड जिल्हा युवकचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, वसंत काठावले, सुधीर मोरे, सरिता पाटणकर, कॅप्टन कलावत, हर्पिंदर वीर, कान्हा कडव, गोविंद पाटील, प्रवीण कांबळे, सुरेश पाटील, शंकर तांडेल, शशिकांत बांदोडकर,  पांडुरंग भोपी  व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.     

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास