खरोशी 

     गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी अलिबागकर बाबा महाराज, गुरुवर्य मारुती राऊत महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ह.भ. प. दिगंबर महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री एकनाथी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी हे सप्ताहाचे 50वे वर्ष आहे.

       आठ सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये  रोजच्या रोज  सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत श्री.एकनाथी भागवताचे वाचन सायंकाळी सहा ते सात श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ पेण यांचे हरिपाठ संध्याकाळी सात ते साडेसात नामजप असा कार्यक्रम  चालू असून या सप्ताहाची सांगता 14 सप्टेंबर रोजी पेण येथे होणार आहे यावेळी सकाळी आठ ते नऊ ग्रंथाची सांगता व वाचकांची पुजा सकाळी नऊ ते दहा हभप नयनतारा म्हात्रे यांचे प्रवचन सकाळी दहा ते बारा मनोज पावशे महाराज( देवाची आळंदी) यांचे कीर्तन आणि दुपारी एक ते दोन महाप्रसाद असा कार्यक्रम असून सर्व परिसरातील मृदंगाचार्य गायनाचार्य कीर्तनकार प्रवचनकार सेवाधारी व नामधारक यासह सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताहाचे आयोजक यशवंत राऊत मालन राऊत केतन राऊत मोहिनी राऊत यांच्यासह श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ पेण यांनी केले आहे.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास