रसायनी 

आपटा गुळंसुद्रे गावाकडे जाताना कोन सावळे रोडची प्रचंड दुरावस्था झाली असून मोठाल्या खड्यांमुळे रोडवर कंटेनर आडवे होवू लागले आहेत. तसेच तुराडे व आपटा गावातील मोरीचे काम अर्धवट केल्याने प्रवाशाना व चालकांना याचा नाहक त्रास होत आहे.  

स्थानिक नेत्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असता मतदानाच्या वेळी केलेली आश्वासने फोल ठरली आहेत. नुसती डागडुजी न करता या रोडचे पुन्हा एकदा भक्कम काम करून रस्त्यावरील विजेचे सुद्धा काम करावे अशी मागणी रसायनी पत्रकार संघांनी केली आहे. 

नवकार कंटेनर समोरील रोडची दुरावस्था झाल्याने या रोडला सिमेंट काँक्रीट चा मुलामा लागणार केव्हा असा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे. 

अवश्य वाचा