पंढरपूर

राष्ट्रीय पातळीवरील ‘ऑलम्पस २०१९’ हा तांत्रिक संशोधनपर स्पर्धा कार्यक्रम येत्या दि.१५ व दि. १६ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १५ व दि. १६ सप्टेंबर या दोन दिवशी राष्ट्रीय दर्जाचे स्पर्धात्मक ‘ऑलम्पस २०१९’ ही स्पर्धा होत असून याची तयारी अंतिम टप्यात आली असल्याचे चित्र दिसत आहे. स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे यांच्या दिशादर्शक व नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली तसेच विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी.टी. काशीद यांच्या नेतृत्वाखाली सहयोगी प्राध्यापकांच्या सहकार्याने स्पर्धेची तयारी सुरु आहे. या स्पर्धेसाठी जवळपास भारतभरातून स्पर्धक येत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासापासून ते भोजनापर्यंतची व्यवस्था अंतिम टप्यात आली आहे. ऑलम्पस २०१९ हा कार्यक्रम अभियांत्रिकीच्या सर्व विभागासाठी असून यामध्ये रोबोरेस, मिस्टर मशीनिष्ट, अॅटोकॅड मॉडेलिंग, अॅग्रो चॅलेंज, टेक्नो गुरु, टाऊन प्लानिंग, एम. कोड मॅटलॅब, कटीया रेस, टेक्नो मेक वॉर, पेपर फिस्ट, बिझनेस प्लान, सर्कीट स्कीमॅटीक, कॅम्पस ड्राईव्ह,  बॉब दि बिल्डर, कॅड रेस, सर्वे हंट, रोबोवॉर, ब्लाइंड सी, वेब डिझाईन, कोड डीबगींग,डीबी मॅनिया, टेक्नो बझ, प्रोटो चॅलेंज, इलेक्ट्रिकल मॉडेल मेकींग, ई-क्वीझ कॉम्पिटीशन, टिकल युवर टेक्नो, बिझनेस क्वीझ, पेपर प्रेझेन्टेशन,पोस्टराईज, एक्सक्वीझ मी, फन झोन असे विविध प्रकारचे संशोधन स्पर्धा होणार आहेत. या संशोधनावर आधारित स्पर्धेला दरवर्षी प्रचंड प्रतिसाद मिळतो. संपूर्ण तयारीवर संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे हे बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे संपूर्ण संशोधन समितीचे यावर नियंत्रण असते. यासाठी विविध समित्यांद्वारे विभागवार कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. बाहेरून आलेल्या संशोधक स्पर्धकांना कोणतीही अडचण येवू नये यासाठी समिती विशेष परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेसाठी रु. दोन लाखांहून अधिक रकमेचे पारीतोषके ठेवण्यात आली आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘ऑलम्पस २०१९’ चे विद्यार्थी अध्यक्ष नितीन टेळे (मोबा. नं-७७२०९०७६३३), सचिव अक्षय हाके व अंजली काटकर, सहसचिवा मोनाली नागटिळक, खजिनदार नागेश रोंगे व पूजा विभूते तसेच एम.बी.ए. विभागाचे समन्वयक स्वप्नील रोपळकर व रुपाली गायकवाड यांच्यासह इतर विद्यार्थी देखील परिश्रम घेत असून या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी प्रा. डी.टी.काशीद (मोबा. नं-९१६८६५५३३५), प्रा.एस.एम.काळे (मोबा. नं-९९६०११८५८०), प्रा. एम.एम.शिंदे (मोबा. नं- ७७०९६६९२०२), प्रा. एम.एस. मठपती (मोबा. नं-९५०३०१९९९७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास