चिपळूण 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार, नेते भाजप- शिवसेनेत प्रवेश करीत असताना चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मात्र नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व उमेदवार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत.यामुुळे आणि मतदार संघातील अनेक विकासकामे पदरच्या खर्चाने करून त्यांनी नागरिकांना राष्ट्रवादी पक्षात येण्यासाठी फ्री हॅन्डच दिला असल्याचे दिसून येत आहे.या मतदारसंघात शेखर निकम यांचे पारडे दिवसेंदिवस जड होताना दिसत आहे. परंतु, याचे मतदानात रूपांतर व्ह्यायला पाहिजे, अशीदेखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.                                   

गेल्या विधानसभा निवडणुकीत शेखर निकम यांचा अवघ्या ५६६८ इतक्या अल्प मतांनी पराभव झाला. मात्र, ते दुसऱ्या दिवसापासून या मतदारसंघात फिरू लागले. इतकेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या सुख- दुःखात सहभागी होऊ लागले. तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे कधी शासन निधीतून तर कधी स्वखर्चातून मार्गी लावली. विशेषतः या मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडविण्यावर भर दिला. यामुळे शेखर निकम यांची जलदुत म्हणून ओळख होऊ लागली. पर्यायाने या मतदारसंघात कोणतेही शासकीय पद नसताना विकासाची मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. याचाच परिपाक म्हणून या मतदारसंघातील अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. हा प्रवेशाचा धडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षात कोणीही प्रवेश करताना दिसत नाही. यामुळे शेखर निकम यांचे पारडे जड होताना दिसत आहे. तसेच नवनिर्वाचित कार्यक्रतेदेखील शेखर निकम यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करीत आहेत. हा प्रवेशाचा धडाक्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होताना दिसत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसविषयी परिस्थिती वेगळी असताना या मतदारसंघात मात्र समाधानकारक चित्र आहे. यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास