उरण

     राज्यातील  ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याचा गौरव करून गौरविण्यात येत आहे. नुकताच उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना   जिल्हा परिषदेने पुरस्कार देऊन सन्मानित केले.

    उरण तालुक्यातुन जासई ग्रामपंचायत प्रथम, धुतूम द्वितीय, भेंडखळ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. भेंडखळ ग्रामपंचायत निर्मल पुरस्कार, स्वच्छता पुरस्कार, आदर्श पुरस्कारानंतर पुन्हा एकदा 2017-18  मध्ये गौरविण्यात आले होते.सदर पुरस्कार सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, ग्रामसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिप सदस्य चित्रा पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    भेंडखळ ग्रामपंचयतीचे ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीला अनेक पुरस्काराने गौरविण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. या पुरस्कारा नंतर यशस्वी नियोजन व सकारात्मक विचारांच्या जोरावर ग्रामपंचायतीला यश प्राप्त झाल्याचे ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे यांनी सांगितले.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास