उरण

    उरण तहसीलदार कल्पना गोडे यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांची बदली झाल्याने उरण तहसीलदार पदी भाऊसाहेब अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

    विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधीच महसूल खात्याच्या बदल्यासह काहींना पदोन्नती देण्यात आली. त्यामध्ये उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांना पदोन्नती देत त्यांची नागपूर येथील वर्धा भूसंपादन उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    या रिक्त झालेल्या जागी मुबंई येथील बोरीवली या ठिकाणी अप्पर तहसीलदार या पदावर काम करीत असणारे भाऊसाहेब अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पदाचा पदभार स्वीकारला आहे.

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास