बोर्ली पंचतन

शिवसेना पक्षाचा विकास कामांशी संबंध कधी आलाच नाही तर सत्ता भाजप सरकारची असली तरी भरडखोल व दिवेआगर गावातील विकासकामांसाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी केले बोर्ली पंचतन विभागामध्ये विविध विकासकामांच्या भूमिपुजन व आपल्या खासदार निधीचे पत्र ग्रामस्थांकडे खासदार सुनिल तटकरे यांनी सुपुर्द केले त्यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.रायगडचे खासदार सुनिल तटकरे काल दुपार पासून बोर्ली पंचतन भागातील भरडखोल, दिवेआगर, बोर्ली पंचतन, सांसद आदर्श वडवली, आदगाव , सर्वे, कुडगाव या गावांमध्ये विकासकामांची घोषणा व भूमिपुजन दौऱ्यावर होते याप्रसंगी त्यांच्या समवेत विविध कार्यक्रमाच्य निमित्ताने श्रीवर्धन मतदार संघाचे अध्यक्ष महमद मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शामकांत भोकरे, उपाध्यक्ष सुचिन किर, युवाध्धक्ष  सिद्घेश कोसबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अफझल मेमन, मंदार तोडणकर, दिवेआगर सरपंच उदय बापट, सभापती मिना गाणेकर, माजी सभापती लाला जोशी, तालुका महिलाध्यक्षा ज्योती परकर, बोर्ली पंचतन सरपंच नम्रता गाणेकर, वडवली सरपंच प्रियांका नाक्ती, रामाबुवा वाघे, कोळी समाजाध्यक्ष भास्कर चौलकर, उपध्यक्ष सोपान काळपाटील, सुजित पाटील, विष्णू धुमाळ, देवेंद्र नार्वेकर, माजी सरपंच निवास गाणेकर, उपसरपंच नमसुर गिरे, गणेश पाटील, विजय पांडव, रऊफ मुकादम, संतोष भायदे, संतोष पाटील तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ बंधु भगिनी मोठया यसंख्येने उपस्थित होते. दिवेआगर येथे कुणबी समाज मंदिर मुंबई मंडळाच्या इमारतीचे भुमिपुजन तसेच अंतर्गत मोहल्ल्या पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपुजन, तसेच सांसद आदर्श ग्राम योजनेच्या वडवली गावामध्ये 25 लक्ष रूपये निधीच्या ग्रामपंचायत बहुउद्देशीय सभागृह, 15 लाखच्या अंतर्गत मुख्य रस्त्याचे, 5लाख मोहल्ला अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन त्यांचे हस्ते करण्यात आले तर बोर्ली पचतन ग्रामपंचायत कार्यालयासाठी 25 लाख खासदार निधीतून देण्याची घोषणा, सर्वे गावातील कुणबी समाज मंदिरासाठी 7 लक्ष तर5 लक्ष मुस्लिम स्मशानभूमी संरक्षक भिंत तर कुडगाव गावासाठी दिड कोटीची पाणी पुरवठा योजना आपल्या प्रयत्नातून करणार असल्याची घोषणा खासदार सुनिल तटकरे यांनी केली आपल्या मनोगता मध्ये खासदार सनिनल तटकरे म्हणाले की, रायगडचा खासदार निवडून जाण्यासाठी श्रीवर्धन मतदार संघाचे स्थान महत्वावचे आहे. दिल्लीमध्ये विकासकामंाचा पाठपुरावा करताना श्रीवर्धन ला झुकते माप देण्याच्या विचारात आसतो आपण मागणसी केलेल्या विकाकामांची पुर्तता विविध शासकीय योजनांतून निश्चितपणे करण्याचा माझा प्रयत्न असेल तर बोर्ली पंचतन मधील अपुर्ण क्रिडा संकूल व इतर कामे करण्याच्या दृय्ष्टीेन आपला पयत्न अबसूल कराण मी विकासकामांचिा वारकरी आहे.भरडखोली व दिवेआगर मध्ये झालेली विकासकामे कोणी कितीही म्हणत असेल की, ती आम्हीच केली आहेत पण प्रत्यक्षात ती विकासकामे आमच्याच प्रसत्नांतून झाली आहेत शिवसेना पक्षाचा विकासकामंाशी कधी संबंध आलाच नाही  तर वडवली मध्ये आपण पहील्या अप्यामध्ये 5 कोटीची विकासकामे करणार असून वडवली गाव पुुढील 5 वर्षामध्ये देशासाठी आदर्शवत गाव ठरेल असे कामे आपण करू असे ते म्‍हाण्‍ाले  

विरोधक शाम भोकरे यांची सुनील तटकरे यांच्यावर स्तुतीसुमने

मागील चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सदस्य ओ प्रतोद असणारे शामकांत भोकरे यांनी आपले पक्ष श्रेष्ठी सुनील तटकरे यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करीत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला सध्या ते शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख् पदावर असून खासदार सुनील तटकरे  हे बोर्ली पंचतन येथे ग्रामपंचायती च्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आले असता व्यासपीठावर शाम भोकरे हे देखील उपस्थित होते बाई पंचतन ग्रुप ग्रामपंचायतीवर सध्या शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आय ची सत्ता आहे ग्रामपंचायत कार्यालयासाठी 25 लक्ष रुपयाचा निधी खासदार तटकरे यांनी जाहीर केला तत्पूर्वी  शाम भोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असूनही तटकरे यांच्या वर स्तुतीसुमने उधळली हे पाहून उपस्थित जनता हि अवाक  झाली बोर्ली पंचतन मध्ये आवश्यक विकासकामाबातीत भोकरे यांनी मागणी केली व आपणच हि कामे करू शकता असेही भोकरे म्हणाले. कार्यक्रम हा ग्रामपंचायतीच्या युतीचा होता त्यामुळे शाम भोकरे यांनी लावलेली उपस्थिती व त्यांनी सुनील तटकरे यांची केलेली स्तुती पाहून काही वेगळ्याच हालचालींची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपुस्थितां मधून व्यक्त केला जात होता.

 

अवश्य वाचा