अनंतचतुर्दशीला श्रीगणेश विसर्जन होईल. या दरम्यानच्या दिवसांत ही विसर्जन झाले आहे. विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी अनेकजण श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी उभे असतात. त्यावेळी पाहायला मिळणाऱ्या गोष्टी वर्षानुवर्षे पाहात आलो आहोत. त्यात घट न होता वाढच होत आहे. चुकीच्या गोष्टींची नक्कल करण्यालाच शहाणपण समजले जात आहे. अशा प्रकारे नक्कल करणारेही आपण जे करत आहोत ते श्रीगणेशाला मान्य होईल का ? याचा जराही विचार करत नाही.  लेझीम पथक, टाळ-मृदुंगाचा गजर करत पार पडणाऱ्या विसर्जन मिरवणूका दुर्मिळच म्हणाव्या लागतील. ११ दिवस गणेशाची आरती करताना टाळ-मृदुंगाचा उपयोग केला जातो. मग विसर्जन मिरवणूकीत या पारंपारिक गोष्टींचा उपयोग करणे का टाळले जाते ? टाळ-मृदुंग फक्त एका चौकटीपर्यंत आणि विसर्जन स्थळापर्यंत पोचेपर्यंत मात्र बेंजो, डान्स हा दुटप्पीपणा नाही का ? विसर्जन मिरवणूकीत होणारा बेंजोचा वापर आणि त्याच्या तालावर डान्स करण्याला विसर्जन मिरवणूक कशी म्हणावी ? 

दारूच्या नशेत बराच वेळ नाचता यावे यासाठी मिरवणूकीत सहभागी होण्यापूर्वी दारू पिणारेही असतात. या बरोबर सिगारेट, तंबाखू यांचे व्यसन करणे  या वेळीही चालूच असते. विसर्जन मिरवणूक म्हटली म्हणजे त्यात डान्स, व्यसन या गोष्टींना थारा असता कामा नये.    

अवश्य वाचा