अलिबाग

      दि.९ सप्टेंबर रोजी स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचे सर्वोसर्वो तसेच रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाने "ग्रंथमित्र "पुरस्काराने सन्मानित श्री नागेश कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी अलिबाग चे नगरसेवक श्री बाळुशेठ पवार हे होते. मंचाचे उपाध्यक्ष तसेच साप्ताहिक "कोकणनामा " चे संपादक उमाजी दादा केळूस्कर यांनी प्रास्ताविक भाषण केले.

        आपल्या भाषणात उमाजी दादा म्हणाले की, नागेश कुलकर्णी यांना लहानपासुनच समाज कार्याची आवड, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेले काम खरोखरच उल्लेखनीय आहे ,आजपावतो अलिबाग मध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनात त्यांचा यामध्ये प्रामुख्याने सिंहाचा वाटा असे.

      यानंतर भाल येथील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचे सल्लागार श्री श्रीरंग घरत यांनी श्री नागेश कुलकर्णी यांच्या कामाचे कौतुक केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    मराठा महासंघाचे श्री उल्हास पवार, जेष्ठ साहित्यीक व नाट्यकर्मी श्री शरदजी कोरडे  ,जेष्ठ नाट्य कर्मी व दिग्दर्शक श्री जगदीश जी नागे माजी नगरसेवक श्री आर. के. घरत  छायाचित्रकार श्री वामन पाटील तसेच त्यांचे मित्र श्रीअजय घरत यांनी जून्या आठवणींना उजाळा दिला .तसेच सौ.व श्री रमेश धनावडे यांनी सपत्नीक शुभेच्छा दिल्या.

    तसेच पोलीस पाटील संघटनेचे व  चेंढरे ग्रामपंचायतीचे पोलीस पाटील श्री विकास पाटील यांनी जून्या आठवणींना उजाळा व स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाची क्षणचित्रांची एकत्रित संग्रहाची फोटो फ्रेम आठवण म्हणून भेट दिली.

         अध्यक्षीय भाषणात श्री बाळुशेठ पवार म्हणाले की, नागेश कुलकर्णी यांना विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्था यांनी सन्मानित केले असून महाराष्ट्र शासनाने "ग्रंथ मित्र "पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांची शेतकरी कामगार पक्ष अलिबाग तालुका संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली  आहे.यात त्यांचे काम करण्याची पध्दत, उकृष्ठ नियोजन महत्वाचे ठरते.रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ,स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून आजपावतो विविध कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

         यावेळी मंचाचे अँड. राजेंद्र जैन, श्री मनोहर कदम,जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे हेमकांत सोनार, श्रीआर.डी पवार, मंदार कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास