मुरुड जंजिरा   

       सद्या मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस बरसात आहे.येथे सूर्य दर्शन होत नसल्याने काळ्याकुट्ट ढंगाने वातावरणात नेहमीच काळोख असतो. त्यातच खोल समुद्रात सुद्धा ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र काळोख दिसून येतो.अश्या या कठीण वातवरणात खोल समुद्रात जाणाऱ्या बोटींना मुख्य आसरा हा समुद्रात असणाऱ्या दिपगृहाच्या असतो.रात्रीच्या समयी दीपगृहातील लाइट प्रखरतेने  प्रजवळीत होऊन समुद्रातील होड्याना दिशा दाखवण्याचे महत्वाचे काम करीत असते.या लाइटच्या प्रकाशावर मच्छिमारांना आपण कोणत्या दिशेला आहोत याचे आकलन होत असते.

         परंतु गेल्या काही दिवसापासून मणेरी नानवेल येथील दीपगृह नादुरुस्त असल्याने येथील लाईटचा प्रकाश रात्रीच्या समयी न पडल्याने मच्छिमारांच्या होड्यांचा धोका अधिक बळावला आहे.त्यातच काही बोटींना दिशा न दिसल्याने त्या भलत्याच ठिकाणी जाऊन भरकटल्या गेल्या आहेत.

याबाबत आपली प्रतिक्रिया देताना रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले कि, नानवेल दीपगृहाची लाइट प्रकाशित न झाल्याने आमच्या कोळी बांधवाना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या ठिकाणी खडक सुद्धा असून जर हि दीपगृहाची लाइट पेटली नाही तर आमच्या होड्या या खडकावर आढळण्याची शक्यता आहे.त्याच प्रमाणे रात्रीच्या समयी काळोख असल्याने मच्छिमारांना दिशा न सापडल्याने होड्या भरकटल्या जात आहेत.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली