पाली/बेणसे 

 सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी,धोंडसे,बहिरमपाडा, वैतागवाडी,नाडसूर,ठाणाळे,नाडसूर कातरवाडी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षा सहल नाडसूर येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ठाकूर फार्म हाउस या  ठिकाणी नेण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करत पर्यावरण रक्षणाचा कृतीयुक्त संदेश दिला आहे.    वर्षा सहल म्हटलं की, फेसाळणारे धबधबे,हिरवेगार सौंदर्य,निसर्गरम्य वातावरणात चिंब भिजणे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहत असते. त्यात चिमुकल्यांना या वर्षा सहली बद्दल खूप उत्सुकता व आकर्षण वाटत असते. पण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीच्या ठिकाणी परिसराची स्वच्छता करत पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.  निसर्गाच्या कुशीतून हिरवळीने दाटलेल्या वनाछदित प्रदेशातून सफर करताना विद्यार्थी व शिक्षकांनी अनोखा आनंद लुटला.

     पर्यटनस्थळी गेल्यावर अनेकजण तेथेच केरकचरा व घाण टाकून परिसर अस्वच्छ करतांना आपण नेहमीच पाहत असतो.निसर्गाचा आंनद घेत असतांना पर्यावरणाची हानी करु नका व पर्यटनस्थळी स्वच्छता राखा.हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.हे चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

    यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक खेळ,आरोग्यदायी चांगल्या सवयी,वृक्षांची ओळख, स्वच्छतेच्या सवयी यासारखे अनेक विषय घेण्यात येऊन निसर्गाच्या सानिध्यात मनोरंजनातून अध्ययन झाले.नृत्य,नाट्य,खेळ व स्वीमींग पुल मध्ये पोहण्याचा आनंद लुटला.

   तद्नंतर ठाकूर फार्म हाऊसचे सह पार्टनर सुजित बारसकर यांनी विद्यार्थ्याची जेवणाची उत्तम व्यवस्था केली. यावेळी केंद्रप्रमुख प्रकाश तायडे,केंद्रप्रमुख रोहेकर सुजित बारसकर,शिक्षक संजय महाडिक, कुणाल पवार,गौरख आघाव,दिलीप गावित,संतोष चौधरी,अंकुश शिंदे,अर्चना चौधरी, आशाताई इप्पर,सुभाष कांबळे उपस्थित उपस्थित होते.

     वर्षा सहलीत आम्ही सर्वांनी खूप धमाल-मस्ती केली.नृत्य,नाट्य विविध खेळ यासोबत स्विमिंग पूल मध्ये पोहतांना खूप मजा आली परिसरातील केरकचरा जमा करून स्वच्छतेचा संदेश दिला.ही वर्षासहल आम्हा सर्वांसाठी आनंददायी,अवर्णनीय व अविस्मरणीय ठरली.   

 कु.  कृपा शेलार,विद्यार्थीनी,पायरीचीवाडी शाळा

दरवर्षी विद्यार्थ्यांची वर्षासहल तालुक्यातील विविध ठिकाणी नेण्यात येते.या वर्षा सहलीतून विद्यार्थ्यांची निसर्गाची जवळीक साधत परिसर स्वच्छ करुन प्रत्यक्ष कृतीतून महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. यासाठी ठाकूर फार्म हाऊसचे उत्तम सहकार्य लाभले. 

  प्रकाश तायडे,केंद्रप्रमुख,नाडसूर

     विद्यार्थ्यांची वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य,नाट्य, विविध खेळ,स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद लुटला.याबरोबरच परिसराची स्वच्छता राखत प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.याचा खूप आनंद वाटला.

   सुजितदादा बारसकर,पार्टनर,ठाकूर फार्म हाऊस.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास