पाली/बेणसे 

सुधागड तालुक्यांतील कवेळे धरणातुन  वाहणाऱ्या ओहळात मंगळवारी एका महिलेचा मृतदेह सापडला. शशिकला मारुती पवार (६५)असे मयत (वृद्ध )महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शशिकला मारुती पवार रा.वाफेघर, ता.सुधागड या बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पाली पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार सभोवतालच्या परिसरात शोध घेतला असता मंगळवार दि.(10)सकाळी 9.30 वाजताचे सुमारास सदर महिलेचा मृतदेह घपकी गावचे विठ्ठल मंदिराचे बाजूचे कवेळे धरणातुन वाहणाऱ्या ओहळात आढळून आला. याबाबत सचिन मारुती पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पाली पोलीस स्थानकात ADR NO: 18 /2019 CRPC 174 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. प्रशांत भोईर करीत आहेत.

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास