ओला-उबेरमुळे वाहन उद्योग संकटात आल्याचे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून यावर लवकरच उपाययोजना काढणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. नवीन वाहनांची विक्री मंदावणे हे वाहन कंपन्यांसाठी दुःखद असले तरी शहरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हितकारक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आर्थिक सुबत्ता वाढल्याने नवीन वाहने खरेदी करू इच्छिणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे; तर दुसरीकडे शहरासारख्या ठिकाणी वाहनांची वाढती संख्या डोकेदुखी ठरू लागली आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषणाची वाढलेली पातळी माणसाचे आरोग्यमान बिघडवू लागली आहे. अशा वेळी वाढत्या वाहन संख्येला कुठेतरी चाप बसने निकडीचे आहे. ओला-उबेरमुळे शहरातील वाढत्या वाहनसंख्येवर अंकुश बसत असेल तर ते नक्कीच चांगले आहे. शहरासारख्या ठिकाणी जागेच्या अभावामुळे पार्किंगची समस्याही उद्भवते, अनेक महाभाग रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या करतात परिणामी वाहतूक कोंडी होते. शिवाय गाड्यांची देखभाल करणे, स्वच्छता करणे या सर्व जाचापेक्षा आपल्याला हवे त्या वेळी हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी ओला-उबेरचा पर्याय शहरातील लोकांना उत्तम वाटतो.  त्यामुळे अर्थमंत्र्यांनी वाहन कंपन्यांचा विचार करताना शहरांच्या आरोग्याचाही विचार करावा. 

अवश्य वाचा