खांब-रोहे,दि.१०

      सुएसोच्या पाली ग.बा.वडेर विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संभाजी तिरमिले यांना रा.जि.परिषदेच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

       रा.जि.परिषदेच्या वतीने सन २०१९/२० मधील जिल्हा आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा जि.प.अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली चेंढरे येथील पी.एन.पी.नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी खा.सुनील तटकरे, आ.जयंत पाटील,आ.पंडित पाटील, आ.बाळाराम पाटील, जि.प.उपाध्यक्ष अँड.आस्वाद पाटील,शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील,महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे,क्रुषी व पशू संवर्धन सभापती प्रमोद पाटील, सदस्या सुश्रुता पाटील,चित्रलेखा पाटील, प्रियदर्शनी पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे,माध्य.शिक्षणाधिकारी बाळासाहेब थोरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

        संभाजी तिरमिले यांनी आपल्या ३१वर्षाच्या सेवाकालात शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही नेहमीच चांगले योगदान दिले आहे. तर सुएसो पतसंस्थेचे संचालक पदी ते दुसऱ्यांदा कार्यरत आहेत.कार्यालयीन कामकाजात ते नेहमीच तत्पर असतात.त्यांच्या सुयशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होताना दिसत आहे.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली