अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

विविध क्षेत्रात योगदान देणार्‍या रायगड जिल्ह्यातील कर्तृत्ववान ग्रामस्थांना रायगड जिल्हा परीषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवारी दि. 11 सप्टेंबर रोजी अलिबाग येथे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग येथील पीएनपी नाटयगृहात दुपारी 3 वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, आ. सुरेश लाड, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या  अध्यक्षा आदिती तटकरे, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे, कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे आदी  उपस्थित राहणार आहेत.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली