अलिबाग 

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच अलिबाग तालुक्याचा चौफेर विकास शक्य झाला असून भविष्यातही अनेक विकास योजना प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार शेकापक्षाचे अलिबाग मुुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार पंडितशेठ पाटील यांनी व्यक्त केला.

 अलिबाग तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीमधील धेरंड येथे नळ पाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन सोहळा आ पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मार्गर्दान करताना ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या भावना पाटील, शहापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.भारती थळे, माजी सभापती सुधीर थळे आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आ पंडीत पाटील पुढे म्हणाले की अलिबाग तालुक्याचा विकास आपण आमदारकीतून मोठया प्रमाणावर निधी आणून केला आहे. खारलँडसाठी कोटयवधीचा निधी आणला. आमदार प्रभावी असेल तरच काम होऊ शकते हे दाखवून दिले आहे.  अलिबाग तालुक्यामध्ये कोटयवधींची विकासकामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. सारळ, मुळे, वाघ्रण, फणसाड यांच्या योजनांना मंजुरी मिळवून आणली. भोनंग पाणी पुरवठा योजनेलाही मंजुरी मिळवली आहे. सीआरझेडमुळे रखडलेली विकासकामे आता सिआरझेड उठवून पुर्ण करु. मतदारसंघात ठिकठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वास आणण्याचा मानस असून लवकरच तोही पुर्णत्वास नेणू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. पंडित पाटील, जिप सदस्या भावना पाटील यांचे ग्रामस्थांनी काढलेल्या मिरवणूकीतून कार्यक्रम स्थळी आगमन झाले. ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर पाणी पुरवठा योजनेचे उद्धघाटन करण्यात आले.

 

अवश्य वाचा