अलिबाग 

शेकापक्षाचे आमदार पंडितशेठ पाटील यांच्या मागणीवर अलिबाग-मुरुड-रोहा या तीन तालुक्यांना जोडणार्‍या साळाव पुलाच्या कामाबाबत हिरवा झेंडा शासनाने दाखविला आहे. या कामाला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे लेखी पत्राने आ. पंडीत पाटील यांना कळविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यानां जवळ आणणार्‍या कुंडलिका खाडीवरील साळाव रेवदंडा पुल नादुरुस्त झाला असल्याने त्याबद्दल शेकापक्षाचे आमदार पंडीत पाटील यांनी 2019-20 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सुचना क्र. 14 नुसार या पुलाच्या कामाची मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार पंडित पाटील यांना लेखी पत्र देत उक्त कपात सुचनेनुसार अलिबाग-मुरुड-रोहा तालुक्यातील दळण-वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा रेवदंडा खाडीवरील साळाव पूलाच्या कामाबाबत प्राधान्यक्रम, निकष व शासनाचे धोरण विचारात घेता याबाबतचा निर्णय घेण्यात येऊन तसे कळविण्याबाबत आश्‍वासित केले आहे.

रायगड जिल्ह्यातील साळाव रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरुड आणि रोहा हे तीन तालुके जवळ आलेल्या या साळाव -रेवदंडा खाडी पुलाचे काम 1986 साली करण्यात आले असून या पुलाची लांबी 510 मीटर एवढी आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. ह्या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांच्या काळात झाला आहे. त्यामुळे रोहा, मुरुड, आणि अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. सालाव रेवदंडा खाडी पुलामुळे मुरुड तालुक्याचा आर्थिक विकास, सामाजिक, औद्योगिक या पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई पुणे येथे जाण्यासाठी चणेरा, रोहा नागोठणे मार्गे वडखळ पेण किंवा साळाव जेट्टी वरून छोट्या होड्यांनी मचवा यांनी रेवदंडापर्यंत पाण्यातून प्रवास करावा लागत असे. मात्र हा पूल झाल्यानंतर या तालुक्यातील दळणवळण जलद गतीने होऊन विकासाची दारे उघडली गेली. पुलाच्या निर्मितीपूर्वी मुरुड तालुका हा मागासलेला होता. सन 1985-86 मध्ये हा पूल वाहतुकीस खुला झाला अन मुरुड तालुक्याचे रूपच पालटले. या पुलाच्या निर्मितीनंतर मुरुड तालुक्याचे नाव हे पर्यटन क्षेत्रात जागतिक स्तरावर गेले आहे.

काही वर्षापूर्वी या पुलाकडे सार्व जनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलाला भेग पडून पुलाखालील पाणी स्पष्ट दिसत होत. मात्र त्यावेळी बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी पत्रा लावून त्या ठिकाणी कॉक़्रिटिकरण करण्यात आले होत. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे देखील बुजविण्यात आले होत. परंतु काही महिन्यापूर्वी परत भेग पडली आहे त्याचप्रमाणे पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे यांची दुरवस्था होऊन काही कठड्यांचा भाग हा समुद्रात कोसळला आहे. वर्षाचे बारा महिने हि मुरुड तालुक्याला प्रती गोवा म्हणून पर्यटक यांची संख्या हि लाखोंच्या घरात जात आहे ह्या पुलावरून पर्यटक यांच्या वाहनांचा ताफा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आह. त्याचप्रमाणे अवजड वाहनेही यां पुलावरून ये-जा करीत असतात. या पुलाचे काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे आ. पंडित पाटील यांनी शासनाचे या पुलाच्या कामाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत शासनाने लवकरच काम करण्याचे संकेत दिल्याने तीनही तालुक्यातील जनता धन्यवाद देत आहे.

 

अवश्य वाचा