सुतारवाडी  

    दिनांक 6, 7, 8 सप्टेंबर 2019  रोजी झालेल्या मुंबई मेयर कप नॅशनल फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करताना कु. सर्वेश निवास थळे याने फ्रिस्टाईल कंपाउंड अंडर टेन गटात सुवर्णपदक पटकावले.

   आपल्या सुवर्णपदकासह 472 गुण मिळवून महाराष्ट्राच्या गुणसंख्येत  भरघोस वाढ केली. वीस राज्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद महाराष्ट्राच्या संघाने पटकावले.

   कुर्डुस अलिबाग येथील असलेला सर्वेश थळे  जे .एम. राठी रोठ रोहा येथे शिकत आहे. त्याला अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. संतोष जाधव सर ( महाड) व श्री. विशाल कदम सर(धाटाव) यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळत आहे.

     सर्वेशच्या या यशाबद्दल सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक रोहा , रायगड व महाराष्ट्र , ग्रामस्थ मंडळ कुर्डुस, नातेवाईकांनी कौतुक केले आहे.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास