आगरदांडा 

पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  प्रशासनसोबतच काही सामाजिक संस्थाकडुन काही प्रमाणात जनमाणसांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्नही केला परंतु प्रशासनकडुन जनजागृतीचा अभावच जाणवत असुन आज ही बहुतांश पर्यावरणाचा घातक असलेल्या प्लॅष्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे दिसते.पाच दिवस गणपती समुद्रात विसर्जन केल्यानंतर सर्व गणेश मुर्ती पुन्हा  समुद्राच्या किनारी आल्या.  त्यावेळी डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे श्री.सदस्यांनी खोल समुद्रात जाऊन पुन्हा गणेश मुर्ती विसर्जन करण्यात आले. हे दरवर्षी प्रमाणे चालुच आहे लोकांना कळते पण वळत नाही  प्रदुषण आणि पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी प्रत्येकांनी शाडुच्या मातीची मूर्ती आणुन गणेशोउत्सव साजरा करावा  हे प्रत्येकला जाणीव असुनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आजही दृष्टीक्षेपात येत आहे.गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाच्या आनंदला उधाण पण काही गणेशभक्तानी प्लास्टर ऑफ पॅरिस उंचच्या उंच गणेश मृर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली दिसुन आली.    प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या घरगुती गणपती भरपुर आहेत.या मुर्ती विसर्जनामुळे  मोठ्या प्रमाणात पाणी प्रदुषण होवुन मानवी आरोग्याला धोका पोहचत आहे. जनमाणसांनीही पर्यावरणाचे महत्व लक्षात घेवुन  पर्यावरणपुरक  व प्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज बनली आहे.

 

अवश्य वाचा