श्रीवर्धन 

 रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी विशेष प्रयत्नाातुन मजुर केलेल्या सुमारे साडेतिन कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे भुमीपुजन त्यांच्याच हस्ते करण्यात आले या वेळी आयोजीत केलेल्या डस्टबीन वितरण कार्यक्रमात बोलताना खास.तटकरे म्हणाले की,श्रीवर्धन मध्ये सर्व समाजाच्या वतीने माझे उत्स्फुर्तपणे स्वागत केल्याने आपण भारावुन गेलो आहोत, श्रीवर्धनचे आजचे एंकदरीत चित्र पाहता आपण केलेल्या विकास कामांचे चिज झाल्याचे समाधान,वाटत आहे या वेळी व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक,मुख्याधिकारी किरण मोरे,तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, डाॅ.अबु राऊत,.अविनाश कोळंबेकर,बाळकृष्ण चाचले दिशा नागवेकर,प्रविता माने,आदी मान्यवर उपस्थीत होते.पुढे बोलताना तटकरे म्हणाले की,श्रीवर्धन शहरासाठी 32 कोटीची योजना राबवणार,लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात मोदी नावाची सुनामी असताना श्रीवर्धनच्या जनतेने आपली नौका पार नेली याचा अभिमान आहे.प्रत्येक निवडणुकीत येथील जनतेने आर्शिवादाची शिदोरी मागे राखली आहे. तशीच आर्शिवादाची शिदोरी अखंडपणे यापुढेही सोबत राहु द्या अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रीवर्धन नगरपालीकेच्या वतीने ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी नागरीकांना 10 हजार डस्टबीन देण्यात येत असल्यावे मागच्या वेळेस स्वच्छता अभियानात श्रीवर्धन नगरपालीकेचा नंबर हुकला असला तरी या वेळेस श्रीवर्धन शहराचा संपुर्ण राज्याततच नव्हे तर देशात अटकेपार झेंडा लागेल आणी त्यासाठी आपण सर्वानी जिद्दीने उतरा मी खंबीरपणे तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. डस्टबीन वाटप कार्यक्रमा पुर्वी खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते,श्रीवर्धन शहरातील मोगल मोहल्ला ते बागवान मशिद अंतर्गत रस्त्याच्या डाबरीकरण करणे,डाॅ.कासिम राऊत चैकापासुन पुलपार मोहल्ला येथे भुयारी गटार बांधणे, ,घोली मोहल्ला येथे भुयारी गटार बांधणे,शराई मोहल्ला येथे भुयारी गटार बांधणे,मुळगााव कोळीवाडा येथे दशक्रिया शेड बांधणे,मुळगाव गांधी मैदान येथे पÚहयाचे बांधकाम करणे,नवीन मुळगाव कोळीवाडा रोड येथे सिमंट क्राॅंक्रिटीकरण करणे,इंइिरानगर येथे स्मशानभुमी रस्त्याचे काॅंक्रिटीकरण करणे,मठाचा गवंड येेथील वडाचे झाडापासुन स्मशानभुमीपर्यंत रस्ता तयार करणे,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चैकापासुन श्री राजु भगत यांचे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे,वरचा जीवना कोळीवाडा येथे पÚहयाचे बांधकाम करणे,

वरचा जीवना कोळीवाडा येथील अंतर्गत रस्त्याचे काॅंक्रिटीकरण करणेव फलेवर ब्लाॅक बसवणे, आदी विकास कामांचे भुमीपुजन करण्यात आले.तर स्वच्छ महाराष्ट्रृ अभियान अंतर्गत कचराकुडीचे वाटप करण्यात आले व शेवटि भैरवनाथ पाखाडी येथे सामाजीक सभागृह बांधणे आदी विकास कामांचे भुमीपुजन करण्यात आले.कार्यक्रमात प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन विरेंद्र वाणी यांनी केले.श्रीवर्धन शहरात पहिल्या पेक्षा मोठया प्रामाणात विकासाची गंगा वाहत असल्याने नागरीक खासदार सुनिल तटकरे यांना धन्यवाद देत आहेत.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली