चिपळूण

   उद्या बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी चिपळूण येथील मल्टीस्पेशालिटी  आणि सुपरस्पेशालिटी अपरांत हॉस्पिटल मध्ये अस्तिविकार विषयक मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

     वयोमानानुसार हाडांची झीज होऊन त्यांची ठिसूळता वाढत जाते.साहजिकच यातून गुडघेदुखी ,संधिवातासारखे रोग बळावत जातात व जीवघेणा त्रास सहन करावा लागतो.ठिसूळपणामुळे शरीरातील कॅल्शियम व व्हिटॅमिन  डी ३, चे प्रमाण कमी होऊ लागते.

     हाडांचा ठिसूळपणा अर्थातच बोन मिनरल डेन्सिटी ची तपासणी बी एम डी मशीनद्वारे केली जाणार असून त्या सोबतच रुग्णांची फुफुसाची कार्यक्षमतेची तपासणी ( स्पायरोमेत्री ) ,रक्तशर्करा तपासणी (आर बी एस ), बॉडी मास इंडेक्स ( बी एम आय ), ई सी जी इत्यादी तपासण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत.

या शिबिराचे वैशिष्ट्य  म्हणजे गौरी गणपती सणाचे औचित्य साधून मुंबईत,पुणे इत्यादी ठिकाणाहून चाकरमनी कोकणात येतात,त्यांना गावी राहणाऱ्या  त्यांच्या आई वडिलांच्या आरोग्याची काळजी असते .अशावेळी ते निश्चितच वडीलधाऱ्या माणसांसाठी या मोफत शिबिराचा लाभ घेतील व तो त्यांनी घ्यावाच असे आवाहन अपरांतच्या  प्रशासनाकडून करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी *दूरध्वनी क्रमांक ०२३५५-२५४२५४/२५४२४५/२५४३४५ मो.७२४९८६०१३६/९३०७५६६७००* यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...