धाटाव

देशात मोदी नावाची सुनामी असताना देखील रायगड जिल्हयाचा लोकसभा उमेदवार म्हणून मतदारानी भरभरुन मते दिली.याआधि सुद्धा जनतेने विकास कामांना मते दिली.धाटाव विभाग आजवर भाईसाहेबांच्या रूपाने राष्ट्रवादीचा अभेद्य गड मानला जात आहे.लोकसभेच्या निवडणुकीत आपण पुन्हा एकदा लक्ष ठेऊन भरभरुन मते दीलित.या सर्वात धाटाव विभागाचा सिंहाचा वाटा आहे असे गौरोद्गार खासदार सुनील तटकरे यांनी नुकत्याच विभागातील भूमिपूजन व उद्घाटन सोहोल्या प्रसंगी काढले.

याप्रसंगी विजयराव मोरे, मधुकर पाटिल, विनोद पाशिलकर,रोहिदास पाशिलकर,अनिल भगत,शंकर भगत,महेश बामुगड़े,सतीश भगत यांसह विविध ग्रामपंचयतीचे सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य,सदस्या,विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की,खासदार म्हणून जनतेला अभिप्रेत असणारे काम करणार असून अनेक योजनाचा कार्यक्रम येत्या कालावधीत आपणास पहावयास मिळेल आणि विकासाचे नवे पर्व पुन्हा एकदा  विरोधी पक्षात असतानाही निर्माण करु.या विभागात भूमिपूजन व उद्घाटन सोहोला होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी शेवटी बोलून दाखविले.

दरम्यान किल्ला येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्ह्या परिषद ग्रामीण पाणीपुरवठा नाल्याला संरक्षक भींत व सकाव,अंतर्गत रस्ता,सार्वजनिक शौचालय.महादेववाड़ी येथे संरक्षक भींत वउदघाटन,अंतर्गत रस्ता भूमिपूजन.एमआयडीसी ते वाशी रस्ता उद्घाटन,बोरघर येथे संरक्षक भींत,जोड़रस्ता बंधारा भूमिपूजन,तळाघर येथे 

संरक्षक भींत,नाल्यावर साकाव,रोठखुर्द येथे संरक्षक भींत उद्घाटन,जोडरस्ता उद्घाटन,स्मशान शेड उद्घाटन,अंतर्गत रस्ता भूमिपूजन यांसह इतर कामाची भूमिपुजने करण्यात आली.

याठिकाणी किल्ला ग्रामपंचायतिच्या तंटामुक्त गाव समिति अध्यक्षपदी एम के बामुगड़े यांची निवड झाल्याबड्डल त्यांचा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर सर्वच ठिकाणी मान्यवारांचाही सन्मान करण्यात आला.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास