अलिबाग

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात काही समाजकंटक राजकीय हेतूने सोशल मिडीयावर चुकीची माहिती प्रसारीत करुन बँकेची नाहक बदनामी करण्याचे गलिच्छ राजकारण करत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर बँकेकडून अशा नतष्टृष्टांचा छडा लावून मुळ आरोपीला समोर आणण्यासाठी  पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीचा शोध लागल्यानंतर त्याच्यावर मोठ्या रक्कमेचा मानहाणीचा दावा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे अशी नाहक बदनामी करण्याचे लवकरच पितळ उघडे पडून त्यांना चांगलाच धडा मिळणार आहे. 
यासंदर्भात रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक भारत नांदगावकर यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच अलिबाग पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील देशातील नावाजलेली बँक असून देशपातळीवरील अनेक महत्वाचे पुरस्कार या बँकेला प्राप्त झाले आहेत. याबाबत बँकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीही पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्याशी सपर्क साधून तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अफवांवर विश्‍वास ठेवू नये जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील अग्रगण्य बँक असून ग्रॅाहकांनी व जनतेने अशा अफावावर विश्‍वास ठेवू नये, आपल्या ठेवी सुरक्षीत आहेत, बँकेची बदनामी करण्यावर कडक कारवाई केली  जाईल, असे बँक प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.


अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली