महाड-दि.९ सप्टेंबर

महाड तालुक्यांतील तेलंगे गावांतील रायगड जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यांत येत होते.सध्या या रस्त्याचे काम संबधीत ठेकेदाराने अपुर्ण ठेवले असुन रस्त्याच्या कामाची सर्व रक्कम ठेकेदाराने वसुल केल्याचे माहिती अधिकारांमध्ये उघडकीस आले आहे.या रस्त्याच्या कामा मध्ये लाखो रुपंयाचा भ्रष्टाचार करण्यांत आला असुन त्याची सखोल चौकशी करण्यांत यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकते जतीन गोरे यांनी केली आहे.

महाड तालुक्यांतील तेलंगे ग्रामपंचायत हद्दीतील तेलंगे गाव ते तेलंगे मोहल्ला हा रस्ता जिल्हा परिषदेचा असुन माजी वेंâद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या खासदार निधींतुन रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामा करीता १५ लाख ५४ हजाराचा निधी मंजुर करण्यांत आला होता.सार्वजनिक बांधकाम विभागा कडून रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिध्द करण्यांत आल्या नंतर सह्याद्री वंâस्ट्रक्शन वंâपनीला रस्त्याच्या कामाचा ठेका देण्यांत आला.गावांतील शाळेमध्ये जाण्या करीता असलेल्या या रस्त्याची लांबी ८४० मिटर असुन या कामाची सुरवात मे २०१८ मध्ये संबधीत ठेकेदाराने केली.थोडे दिवस काम करण्यांत आल्या नंतर रस्त्याचे काम थांबविण्यांत आले.त्या नंतर काम कधी सुरु करण्यांत येणार असल्याची चौकशी ठेकेदारा कडे करण्यांत आल्या नंतर उडवा उडवीची उत्तरे देण्यांत आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सदर रस्त्याच्या कामा संबधी महाड सार्वजनिक बांधकाम विभागा कडे केली असता त्यांच्या कडूनही वेगवेगळी कारणे सांगण्यांत आली.ग्रामस्थांनी वांरवार चौकशी करुनही रस्त्याच्या कामा विषयी कोणतीच माहिती मिळत नसल्याने रस्त्याच्या कामा ंमध्ये लाखो रुपयांचा अपहार करण्यांत आला असल्याचा संशय व्यक्त करण्यांत आल्याने सदरच्या कामाची सखोल चौकशी करण्यांत यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

तेलंगे गावांतील सामाजिक कार्यकर्ते जतीन गोरे यांनी पुढाकार घेऊन तेलंगे गाव ते तेलंगे मोहल्ला या रस्त्याच्या कामा संदर्भात माहिती अधिकाराचा अर्ज सा.बा.विभागा कडे देण्यांत आला.महिना होऊनही माहिती मिळत नसल्याचे पाहून जतीन गोरे  सह तेलंगे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत लोकसभा निवडणुक मतदाना वर बहिष्कार टाकण्याचे जाहिर केले.सदरचे वृत्त राजकीय पक्षाच्या कार्यकत्र्याना समजताच उर्वरीत काम सुरु करण्यांत आले.गावांतील कांही ग्रामस्थ रस्त्याच्या कामाला हरकत घेत असल्याने काम थांबविण्यांत आल्याचे सांगण्यांत आले.प्रथम गावांतील वाद मिटविण्यांत यावा त्या नंतर आपण काम सुरु करणार असल्याचे सह्याद्री वंâस्ट्रक्शन कडून कळविण्यांत आले.

त्या नंतर कांही दिवसांमध्ये म्हणजेच जुलै महिन्यांत अचानक रस्त्याचे काम पुर्ण करण्यांत आले असल्याचा फलक ठेकेदारा कडून लावण्यांत आला.रस्त्याचे काम अपुर्ण असताना काम पुर्ण करण्यांत आले असल्याचा फलक लावण्यांत आल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यांत आले.त्याच बरोबर रस्त्याच्या कामाची चौकशी तातडीने करण्यात यावी अशी मागणी देखिल  करण्यांत आली.त्या नंतर सामाजिक कार्यकर्ते जतीन गोरे यांनी माहिती अधिकारांमध्ये सा.बा.विभागा कडे अर्ज केल्या नंतर सविस्तर महिती मिळाली असता या मध्ये अपहार करण्यांत आला असुन गावांतीलच कांहीजणांचा या मध्ये सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यांत आली आहे. आगामी निवडणुकी पुर्वी रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यांत यावी अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यांत आला आहे. 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास