रोहाअष्टमी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारणीची सभा खा.सुनिल तटकरे यांच्या उपस्थिति सुतारवाडी येथे झाली असुन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी विजयराव मोरे, रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी मधुकर पाटील व रोहा तालुका अध्यक्षपदी विनोदभाऊ पाशिलकर यांची निवड करण्यात आले आहे.

रोहा तालुक्यात राजकारण व समाजकारणातील मातब्बर नेते म्हणुन अोळख असलेले विजयराव मोरे, मधुकर पाटिल व विनोदभाऊ पाशिलकर हे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक आहे.यांनी मागील ग्रामपंचायत निवडणुक ते लोकसभा निवडणुकी पर्यंत संघटनात्मक चांगले काम केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकित चांगले यश मिळाले होते.पुढील विधानसभा निवडणुकित यांची ताकत राष्ट्रवादी पक्षाला मिळणार आहे.या अाधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  विजयराव मोरे यांनी जिल्हा उपाध्यक्षपद, मधुकर पाटील यानी तालुका अध्यक्षपद व विनोद पाशिलकर यांनी तालुका खजिनदार पद प्रभावीपणे सांभाळले होते.

यासभेस आ.अनिकेत तटकरे, जिल्हा परीषद अध्यक्षा आदिति तटकरे यासह जिल्ह्यातील  राष्टवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते,विविध सेलचे पदाधिकारी व राष्टवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

विजयराव मोरे,मधुकर पाटिल, विनोद पाशिलकर यांच्या निवडीनंतर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व समाजातील विविध स्तरातील मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास