अलिबाग 

जिल्हा क्रिडा परिषद, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी संकुल येथील क्रीडांगणावर आयोजीत करण्यात आली होती,  स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी पीएनपी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या संजीवनी नाईक, क्रिडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, आणि इतर शाळांचे क्रिडा प्रशिक्षक आणि क्रिडा रसिक यांच्या उपस्थितीत पार पडला.

१४ वर्ष वयोगट मुलांमध्ये आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा चीवे सुधागड प्रथम तर द्वितीय को.ए.सो. हायस्कूल बिरवाडी महाड, मुलींमध्ये प्रथम क्रमांक के. ई. एस. कन्या विद्यालय महाड तर द्वितीय शारदा विद्या मंदिर कासू पेण, १७ वर्ष वयोगटात मुलांमध्ये आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा चीवे सुधागड प्रथम क्रमांक, को. ए. सो. अरुण कुमार वैद्य हायस्कूल अलिबाग, द्वितीय क्रमांक तर मुलीमंध्ये अनंत भोईर विद्यालय दापोली प्रथम क्रमांक तर पी.एन.पी. शाळा काकळघर मुरुड द्वितीय. १९ वर्ष वयोगटात सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनीअर कॉलेज पेण प्रथम क्रमांक, तर सर. एस. ए. हायस्कूल मुरुड द्वितीय क्रमांक तर मुलीमंध्ये अलिबाग स. म. वडके ज्युनीअर कॉलेज चोंढी प्रथम क्रमांक तर द. ग. तटकरे ज्युनीअर कॉलेज रोहा द्वितीय क्रमांक मिळवून विजयी ठरले.

सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी तालुका क्रिडा समिती सदस्य, क्रिडा प्रशिक्षक रमेश भगत, तेजस म्हात्रे, पुरुषोत्तम पिंगळे, प्रमोद भगत, गुरव सर, गायकवाड सर, जनार्दन पाटील, आणि इतर पीएनपीचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी क्रिडा रसिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

अवश्य वाचा