तळे 

यंदा सर्वत्र पाऊस छान पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे महापुराचा फटका बसून नुकसान झाले आहे. परंतु तळे परिसरात उत्तम पाऊस पडत आहे. भातशेतीला आवश्यक असणारा पाऊस पडत असल्यामुळे तळे येथील शांताराम खांडेकर यांच्या शेतामध्ये भातपीक सुंदर आले असून हाळवी भातशेती फुलू लागली आहे.

शेतकरी वर्षभर शेतात मेहनत करीत असतो. आपल्या काळ्या आईची मशागत करून वर्षानंतर येणार्‍या पिकावर आपले कुटुंब चालवायचे. पाऊस उत्तम पडला तर भातशेती छान येते, तेव्हा आम्ही शेतकरी पावसावर अवलंबुन असतो. शेतात येणार्‍या पिकावर बळी राजा सुखावतो. या वर्षी उत्तम पाऊस पडल्यामुळे हाळवी भातशेती फुलू लागली आहे. दरवर्षी या दरम्यान पाऊस कमी असतो तेव्हा भात पीकात दाणा भरायला सुरूवात होते, परंतु चालू वर्षी सातत्याने पाऊस पडत आहे. हा पाऊस गरव्या भातशेतीसाठी उपयुक्त आहे. सातत्याने चार महिने शेतात विविध शेतीची कामे केल्यानंतर शेतकर्‍याला पीक दिसते. त्यातूनच ऐन कापणीच्यावेळी पाऊस पडला तर फार मोठे नुकसान होते. आज मात्र भातशेतीचे पीक चांगले आले असून भातपीक फुलू लागले आहे असे तळे येथील शेतकरी शांताराम खांडेकर सांगत होते. 

अवश्य वाचा