खरोशी

     महाराष्ट्रात  विधानसभेच्या निवडणुकीची तारीख येत्या काही दिवसात जाहीर होण्याची संभावना होत असताना मात्र महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघात निवडणुकीच्या पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे महाराष्ट्रातील माजीमंत्री आमदार खासदार ते गावच्या कार्यकर्त्यांपासून जो तो पक्षांतर करत आहे. 

    नुकत्याच झालेल्या लोकसभेत भाजप शिवसेनेला चांगले यश प्राप्त करता आले त्यामुळे भाजपाच्या विकासात्मक धोरणांमुळे भाजपला सुगीचे दिवस आले आहे. मागील अनेक वर्षे केंद्रांत व राज्यात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी सत्ता भोगली मात्र आजच्या घडीला काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते मंडळी  यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकून भाजप शिवसेनेत प्रवेश करीत आहेत त्यामुळे दिल्लीत अथवा मुबंईत होणाऱ्या पक्षप्रवेशा बरोबर आता ग्रामीण भागातील कार्यकर्ते ही आपल्या मतदारसंघातील नेत्यांकडे पक्षप्रवेश करीत आहे त्यामुळे पक्षांतराचा जोर महिन्याभरात वाढतच चालला आहे .

   पेण तालुक्यातील अनेक भागातील कार्यकर्त्यांच्या वाढत्या पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांवर आज हा तर उद्या तो झेंडा हाती घेण्याची वेळ आली आहे पेण तालुक्यातील अनेक भागातील कार्यकर्ते आज भाजप तर उद्या शेकाप आणी परवा शिवसेना असा आपला दिनक्रम चालू ठेवला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कोणता झेंडा घेऊ हाती ही वेळ आली आहे.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास