उरण मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फुंडे येथे एस एस पाटील सभागृहात बठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल आपल्या भाषणात म्हणाले आपल्याला जासई येथील रविवारी 15 सप्टेंबर तारखेचा मेळावा यशस्वी     करावयाचा आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय थोड्या मतांनी झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे त्याचे उट्टे काढण्याची संधी या निवडणुकीत आपल्याला करायची आहे   त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आपल्यातील हेवे दावे बाजूला सारून एकजुटीने काम करू या कोणी कितीही म्हणत असतील तरी उरण मध्ये लाल बावटा फडकणार   ।कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये येत्या 15 तारखेला होणारा मेळाव्यात शेकापची ताकद धाखवुन  धयाची आहे गावोगावच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्या सह मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे  युवक संघटना लाल ब्रिगेड संघटना  महिला संघटना पंचायत समिती गट  गाव चिटणीस उरण शहर विविध सेलचे अध्यक्ष यांनी मीटिंग घेऊन त्याचा आढावा चिटणीस मंडळ याना द्यावा  ।मेळाव्याचे बॅनर गावोगावी लावून खटारा चिन्ह याचा प्रचार करावा  ।सुरवातीला प्रास्ताविक भाई जीवन गावंड यांनी केले यावेळी त्यांनी सांगितले की साहेबांच्या प्रचाराला लागा ।प्रत्येक गावात मताधिक्य कसे वाढेल याकडे लक्ष द्या   ।साहेबांनी केलेली विकासकामे लोकांना सांगा गेल्या साडेचार वर्षात उरणला समस्या वाढत आहेत वाहतूक कोंडी अपघात खराब रस्ते हॉस्पिटल असुविधा जे एन पी टी भरवामुळे घरामध्ये पाणी जाते  डी पी डी धोरणामुळे तारुण्याच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे याना उभे राहण्याचा अधिकार नाही इतके उरणला पाठीमागे नेले आहे आता उरणला शेकाप च तारणार आहे.शेकाप चा संघर्ष येथिल प्रश्न सोडविल त्यासाठी साहेबाशिवाय पर्याय नाही।   यावेळी जेस्ट नेते काका पाटील रमाकांत म्हात्रे रमाकांत पाटील  सुरेश पाटील दत्ता घरत नाना मोरे सीमा घरत  सुहास घरत आदीनिि  आपले विचार  मांडले या वेळीं सभापती नरेश घरत उपसभापती   वैशाली पाटिल प स सद्यस्य ऍड सागर कडू मा उपसभापती महादेव बंडा शहर मा प स सद्यस्य महेश म्हात्रे शहर  चिटणीस शेखर पाटील   सरपंच रमाकांत जोशी   कामगार नेते रवी घरत युवक अध्यक्ष मयूर सुतार   विजय कडू  मोरेश्वर भोईर उपसरपंच प्रदीप नाखवा मा उपनगराध्यक्ष नहिदा ठाकूर   रा जी प महिला आघाडी उपाध्यक्ष सुप्रिया म्हात्रे शहर अद्यक्ष नयना पाटील कविता म्हात्रे   शंकर भोईर नारायण पाटील मनीष कातकरी  यशवंत ठाकूर  अनंत घरत  भारत थळी  जीवन पाटील  जयवंत तांडेल नयन म्हात्रे रवी पाटील  सरपंच चंद्रशेखर पाटील  कुंदन पाटील   किरण घरत  आदी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुरवातीला उरण ओ एन जि सि  दुर्घटने मध्ये  आपले प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानाना  तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली