सिंधुदुर्ग

  वेंगुरले नगरपरिषदेच्या २०११ सालच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या राडाप्रकरणी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि जि.प.चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दोषी ठरवत ७ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३१  हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.दंड न भरल्यास ३० दिवस साधी कैद अशी शिक्षा सूनावण्यात आली. या खटल्यातील उर्वरित ४४ आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

               ५ डिसेंबर ,२०११ रोजी वेंगुरला नगरपरिषद निवडणुकी दरम्यान उपरकर आणि त्यांचे अंगरक्षक मारुती शांताराम साखरे हे रात्री ११  च्या सुमारास सुंदर-भाटले येथील सेना कार्यालयात बसले असता यावेळी संशयित आरोपी नलावडे आणि सावंत यांच्यासह अन्य ४४ जणानी हातात लाठया-काठया आणि सोडयाच्या बाटल्या घेऊन येत उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता हैंतोआणि कार्यालयातील साहित्य आणि कार्यालयाबाहरील वाहनांची तोड़फोड़ करून नुकसान केले.यावेळी त्यांचा अंगरक्षक साखरे यांनी आपल्या पिस्तुलातून डॉन राउंड फायर केल्या होत्या.

   याबाबतची फिर्याद साखरे यानी वेंगुरला पोलीस ठाण्यात केली होती.त्यानुसार वरील ४७ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याच्या कामी सरकार पक्षाच्या वतीने प्रथम सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुधीर भणगे यानी साक्षीदार तपासले.तर तत्कालीन सरकारी वकील सूर्यकांत खानोलकर यांनी युक्तिवाद केला.कालच्या शेवटच्या दिवशी विद्यमान सरकारी वकील संदेश तायशेटे यानी युक्तिवाद केला.

अवश्य वाचा