खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीनजीक दुचाकीस्वार कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात तेजस प्रकाश दंत (२५ रा. घाटकोपर-मुंबई) याचा मृत्यू झाला. तो आपल्या ताब्यातील होंडा सीबीआर दुचाकी घेवून गणेशोत्सवासाठी मुंबई येथून गावी येत होता. कशेडी घाट उतरत असताना अचानक त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो समोरून येणाऱया कंटेनरवर आदळून गंभीररित्या जखमी झाला. उपचारार्थ तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाची ओळख पटवण्यास अडथळे निर्माण झाले होते. अखेर अथक प्रयत्नानंतर ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी अपघातस्थळी भेट दिली.

अवश्य वाचा