सिंधुदुर्ग 

     नारायण राणें यांनी आजपर्यंत डझनभर तारखा जाहीर केल्या आहेत आणि यापुढेही ते आणखी तारखा जाहीर करत राहतील.राणेंची सद्याची राजकीय अवस्था 'लांडगा आला रे आला' मधील गोष्टी सारखी झाली आहे अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या संभाव्य भाजपा प्रवेशावर त्यांची खिल्ली उडवली.मालवण तालुक्यातील तळगांव येथील आपल्या निवास्थानी पात्रकारांशी राऊत बोलत होते.

      भाजपाला सर्वप्रथम युती महत्वाची आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा युतीचीच सत्ता येणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

       शिवसेनेसाठी नारायण राणें हा विषय संपलेला आहे.त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशावर आपणास काही बोलायचे नाही ,तो भाजपाचा अंतर्गत विषय आहे.आम्ही केवळ युतीच्या अंतिम निर्णयाकडे पहात आहोत.युतीचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या वेळीच झाला आहे असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

       आता मित्र पक्षांना जागा सोडून अन्य जागांबाबत लवकरच निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

      शिवसेनेला गृहीत धरून उमेदवारीचा आकडा निश्चित केला जाणार नाही असे सांगून राऊत म्हणाले,गेल्या काही महिन्यात अनेक विद्यमान आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तेव्हा त्यांना पुन्हा संधी देण्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख घेतील असेही  राऊत यानी स्पष्ट केले.

              रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

अवश्य वाचा