अलिबाग,

हनुमान तालीम संघ व वाडगाव ग्रामस्थ यांच्यावतीने रविवारी (दि.8 सप्टेंबर) दुपारी 2 वाजता भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते आणि जि.प.उपाध्यक्ष अ‍ॅड.आस्वाद पाटील,माजी जि.प. सदस्य संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.या स्पर्धेत मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे, रायगड आदी जिल्ह्यातील सुमारे 250 ते 300 मल्ल सहभागी होणार आहे.विजेत्या मल्लांना प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती तालीम संघाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर यांनी दिली आहे.

अवश्य वाचा