खोपोली

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलीबाग आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा 2019 खोपोली येथील कारमेल स्कूल मधे दि.29 ते 31 ऑगस्ट 2019 रोजी उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून विविध गटात 35 संघानी सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापीका सिस्टर लिओनी,डॉक्टर नलिन शाह यांच्या हस्ते करण्यात आले.या समयी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी सचिन निकम सर उपस्थीत होते.
स्पर्धेचे  शिस्तबद्ध आयोजन स्पर्धा समन्वयक व शाळेचे क्रीडा शिक्षक रायगड भूषण श्री जगदीश मरागजे सर यानी केले होते. श्री समीर शिंदे सर व जयश्री नेमाने मैडम,तसेच श्री आयप्पन यांचे सहकार्य लाभले.

या स्पर्धेचे वैशिष्टये म्हणजे कारमेल स्कूलचे  चार ही संघ अंतीम फेरी मधे दाखल झाले होते.त्या पैकी 14 व 17 वर्ष मुली संघ जिल्यात प्रथम आले असुन त्या संघाची निवड मुंबई विभागीय स्पर्धे साठी झाली आहे.तर 14 व17 वर्ष मुले हे संघ उपविजेते ठरले.नियमित सराव आणि  आहार तसेच योग्य मार्गदर्शन हेच आमच्या यश्याचे गमक आहे असे खेळाडू आनंदाने सांगतात त्या मुळेच आम्ही दरवर्षी जिल्हा राज्य आणी राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो.
सर्व विजयी खेळाडूंचे शाळेच्या लोकल मनेजर सिस्टर लीली पॉल मुख्याध्य्पिका सिस्टर लियोनी तसेच सिस्टर क्लियरस यानी कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली