नेरळ

कर्जत तालुक्यात सीबीएसई माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या सुंदर इंग्लिश मिडीयम स्कुलने आंतरशालेय लोक नृत्य स्पर्धेत बाजी मारली.15 शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे आयोजन आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने केले होते.

महाराष्ट्राची लोक कला आणि लोक नृत्य यांची माहिती व्हावी यासाठी आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने इंपायर टू एक्सपायर या आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन पोसरी येथील सुरभी लॅन्स मध्ये केले होते. तालुक्यातील 15 नामांकित शाळांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र सदाशिव थोरवे यांचे हस्ते करण्यात आले.त्यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष मीना महेंद्र थोरवे, संस्थेचे सचिव अभिषेक सुर्वे,सदस्य हर्षल विचारे, यांच्यासह या संस्थेच्या सुंदर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका चंद्रशेखर,आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती दाखविणारे नृत्य सादर करून स्पर्धेची चुरस वाढविली. स्पर्धेसाठी परीक्षक कर्जत तालुक्यातील नामांकित कलाकार यांनी काम पाहिले.

तालुक्यातील 15 नामांकित शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत सीबीएसई माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या सुंदर इंग्लिश मिडीयम स्कुलने बाजी मारत विजेतेपद पटकावले.तर कर्जत गुंडगे येथील गुड शेफर्ड स्कुल ने दुसरा तर कर्जत महिला मंडळ संचालित विद्या विकास शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.पारितोषिक वितरण समारंभ पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयोजक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र थोरवे यांनी भविष्यात यापेक्षा मोठ्या स्पर्धांचे आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट करील असे आश्वासन दिले.तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा आणि कला क्षेत्रात सर्व थरातील विद्यार्थी यांच्यासाठी काम करायचे असून विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ उभे करण्याचे काम केले जाईल असे थोरवे यांनी जाहीर केले. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली