मोहोपाडा

चौक कलोते येथील संत डाॅ.गुरमित राम रहिम सिंह इन्सो आश्रमात गुरुगदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने डेरा सच्चा सौदाभक्तांकडून आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेली खालापूर तालुक्यातील डेरा सच्चा सौदा च्यावतीने परीसरातील शालेय विद्यार्थ्यांना दफ्तरासह शालेय साहित्य तसेच गरीब व निराधार व्यक्तिंना एका महिन्याचे किराणा सामानाचे रेशनिंग देण्यात आले.

कलोते येथील गुरमित रामरहिम आश्रमात भक्तांकडून वर्षंभरात १३४ कार्यक्रम राबविण्यात येतात.गुरुगदी दिवसानिमित्त गायन भजनाचा कार्यक्रम  होवून कलोते विभागातील  शालेय विद्यार्थ्यांना दफ्तर,कंपास व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेली विद्यार्थ्यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.तसेच गरीब निराधार नागरिकांना महिनाभराचे किराणा सामान वाटप करण्यात आले.यावेली सरपंच रेश्मा ठोंबरे,माजी सरपंच रवि बागारे, विशाल ठोंबरे,शिक्षक संदिप जाधव, ग्रामपंचायत सदस्या दर्शंना शिंगवा आदी मान्यवर उपस्थित होते.यावेली मान्यवरांना  भेटवस्तू व ग्रॅथ भेट देण्यात आले.

डेरा सच्चा भक्तांकडून अनाथांना मदत करणे,मुलींचे विवाह, रुग्णांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आरोग्य शिबिर आदी विविध १३४ कार्यक्रम घेण्यात येतात.या कार्यक्रमाला वन्ना भाईजी,वालिया भाईंजी,गुरुदयाना इन्सा, सुनील मोरे इन्सा,कृष्णकुंडे इन्सा, सुखदेव इन्सा,नंदा इन्सा, गुरुदेव इन्सा, आदींनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.

अवश्य वाचा