मोहोपाडा

चौक येथील श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलमध्ये  महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत “मिशन ऑलिम्पिक” चे यशस्वी आयोजन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यासाठी करण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे अनन्य साधारण महत्त्व आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनातर्फे अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यालयात मा.प.पू. ऋषीचरणदास स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. प.पू. योगेश्वरदास स्वामी व मा. प.पू. आत्मस्वरूपदास स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.    

विद्यालयातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पूर्व प्राथमिक ते माध्यमिक च्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपाने सहभाग घेतला. ५० मी., १०० मी. , २०० मी., ४०० मी., ८०० मी., १००० मी, इत्यादी अंतरासाठी शर्यती घेण्यात आल्या. सर्व विजयी उमेदवारांना सुवर्णपदक, द्वितीय क्रमांकाने विजयी उमेदवारांना रजतपदक तसेच तृतीय क्रमांकाने विजयी उमेदवारांना कांस्य पदक मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य जॉन्सन यांच्या नियोजनाप्रमाणे सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

अवश्य वाचा