चिपळूण 

तालुक्यातील शिरगाव येथे आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी विविध विकासकामांची भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती सरपंच अनिल शिंदे यांनी दिली. आम्ही निवडणुकीत ग्रामस्थांना विकासकामांचा जो शब्द दिला होता, तो शब्द आम्ही पूर्ण करीत आहोत आणखी विकासकामे करून गावाला विकासाकडे नेणार अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते व पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांनी दिली आहे.                 

गावातील विकासकामांची भूमिपूजन आणि उद्घाटने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्या हस्ते होतील. यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, तालुकाध्यक्ष  जयदंर्थ खताते,  पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, सरपंच अनिल शिंदे, जयंत शिंदे यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. तर या विकासकामांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार मजिद मेमन, आ. बाळाराम पाटील, आ. नरेंद्र अण्णा पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. तर पाठपुरावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शेखर निकम यांच्यासह युवा नेते बाबू साळवी, सरपंच अनिल शिंदे आदींनी प्रयत्न केले. यामुळे आज गावात विकासकामे होत आहेत, असे बोलले जात आहे. याबद्दल   ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अवश्य वाचा