इतिहासच इतिहास घडवत असतो. आता हेच पाहा ना, सन 1939 मध्ये रहमत अलीने लंडनमध्ये जिना आले असताना ‘पाकिस्तान’ या नव्या राष्ट्राची कल्पना मांडून दाखवली. त्यांचे बोलणे ऐकल्यावर हा निव्वळ मूर्खपणा! असे ते म्हणाले तरी रहेमत अली बोलतच होते. तेव्हा बेताल बडबड, अशी रहमत अलींची जिनांनी संभावना केली. मात्र, अवघे काही महिने मध्ये गेले आणि मग हेच जिना 1940 साली लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लिगच्या अधिवेशनात वेगळ्या पाकिस्तानची मागणी जाहीरपणे करू लागले आणि ते त्यांनी मिळविले, पण कसे? यासाठी हजारो वर्षे मागे जावे लागले. 

तसे पाहिले तर मुसलमान जेते म्हणूनच या देशात राहिले. शिवशाही आणि पेशवाईच्या रुपाने मुस्लिम सत्ताधीशांना वचक बसला. त्या नामशेष होताहेत असे वाटत असतानाच इंग्रजांच्या रुपाने तिसरी शक्ती उद्याला येऊन सर्व देशी सत्ता नामशेष झाल्या. पण, आपण हजारो वर्षे, या देशावर राज्य केलेच; आपण जेथे आहोत, ही भावना मुसलमानांच्या मनात कायम होती. आणि, म्हणूनच 1857च्या उठावाला मुसलमानांनी सर्वपरीने सहकार्य केले. अपवाद फक्त सर सय्यद अहमदखानचा. या द्रष्ट्या मुस्लिम समाजसुधारकाने तेव्हाच सांगितले की, हिंदू-मुस्लिम सर्वच बाबतीत वेगळे आहेत. इंग्रजांप्रमाणे आपणही या देशात परकेच आहोत. तेव्हा त्यांना साथ द्या. या विचारांचा हळूहळू प्रभाव मुसलमानांवर पडू लागला. 1906 साली मुस्लिम लिगची स्थापना झाली; पण त्यांचा प्रभाव नव्हता. 1920 च्या सुमारास गांधीजींनी धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म घुसवला. ‘खिलाफत चळवळ’ सुरु केली आणि राष्ट्रवादी असलेले जिना पुढे राष्ट्रद्रोही बनले. त्यांच्या जोडीला ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ म्हणणारे कवी इकबालही सामील झाले. पाकनिर्मितीची एक चांडाळचौकडीच तयार झाली. या चांडाळांनी महात्मा असणार्‍या गांधीजींना, पंडित असणार्‍या नेहरूंना, पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेलांना आणि... आणि आणखीही बर्‍याच भारतीय नेत्यांना निष्प्रभ केले. 

1930 नंतर जिना आणि त्यांच्या मुस्लिम लिगने राष्ट्रीय चळवळीत सामील व्हायला सपेशल नकार दिला. पण, तरीही मुस्लिम समाजावर काँग्रेसचाच प्रभाव होता. कारण, 1937च्या निवडणुकीत अवघी 4.4 टक्के मते जिनांच्या मुस्लिम लिगला पडली. कदाचित दुसरा कोणी असता तर या अपयशामुळे निराश झाला असता. तसे पाहिले तर जिनाही निराश झाले; परंतु त्यांनी तोंडावर तसे दाखवले नाही. मग जिनांनी गलिच्छ जातीय प्रचाराला सुरुवात केली. आपल्या मागण्या वरपक्षाप्रमाणे वाढवायला सुरुवात केली. मुसलमानांनी गोहत्येचे अनिर्बंध स्वातंत्र्य हिंदुस्थानात मिळालेच पाहिजे ही एक भयानक मागणी, तसेच राष्ट्रध्वजात बदल, वंदे मातरम्ला विरोध इत्यादी त्यांच्या मागण्या होत्या. 

अखेर पाकिस्तानच्या इतिहासातील तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1940 सालच्या लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर मात्र, भरपत्रकार परिषदेत जिनांनी ‘आम्ही आजपासून सनदशीर मार्ग सोडून दिले आहेत,’ असे जाहीर केले आणि पाकनिर्मितीसाठी एक भयानक कार्यक्रम आखला, तो म्हणजे, ‘प्रत्यक्ष कृतीदिन’. 22 मार्चला पाकिस्तान दिनानिमित्त संदेश देताना जिना म्हणाले, कोणत्याही मार्गाने आम्ही पाकिस्तान मिळवणारच. हा प्रत्यक्ष कृतिदिनाचा कार्यक्रम जिनांनी गुलदस्त्यातच ठेवला. हिंदू नेते आणि समाज गाफील राहिल्याने 16 ऑगस्टला प्रचंड मोठी किंमत त्यांना मोजावी लागली ती अशी. 

16 ऑगस्ट 1946 ला कोलकात्यात हिंदूंच्या रक्ताने प्रत्यक्ष कृतिदिनाची अंमलबजावणी झाली. अखेर इंग्रजांनाही आता येथे राहण्यात काही अर्थ उरला नव्हता. 24 ऑगस्ट 1946 ला व्हाईसरॉयनी हंगामी सरकार जाहीर केले. लीग त्यात सामील झाला. नवे व्हॉईसरॉय म्हणून लॉर्ड माऊंटबेटन यांनी सूत्रे हातात घेतली. 3 जून 1947 ला त्यांनी फाळणीची योजना जाहीर केली. तिलाही जिनांचा विरोध होता. कारण, त्यांना मोडकेतोडके पाकिस्तान नको होते. शेवटी माऊंटबेटन यांनी ही योजना तुम्ही स्वीकारली नाही, तर ब्रिटिश तुम्हाला पाकिस्तान देणार नाही, असा इशारा दिल्यावर जिनांचे अवसान गळाले. कारण, आतापर्यंत ते जे काही करत होते, ते ब्रिटिशांच्या पाठिंब्यावर, तेव्हा नाइलाजाने त्यांनी ही योजना मान्य केली. 4 जूनला पत्रकारांना माऊंटबेटनने फाळणीच्या योजनेची कल्पना दिली. 14 जूनला काँग्रेस महासमितीत फाळणीबाबत मतदान झाले. तेव्हा 157 अनुकूल, तर 20 प्रतिनिधींनी प्रतिकूल तर 32 जण तटस्थ राहिले. असे मतदान झाले. यानंतर 7 ऑगस्ट रोजी जिना कराचीत निघून गेले. 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या घटना समितीची बैठक झाली आणि 14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तान नावाचे नापाक राष्ट्र उदयाला आले. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947चा सूर्योदय होण्यापूर्वी हजारो वर्षे अबाधितपणे अखंड असलेली ही भारतमातेची भूमी 14 ऑगस्ट 1947 रोजी दुभंगली आणि पाकिस्तान नावाचा देश जगाच्या नकाशावरउदयाला आला.

दिनांक 14 ऑगस्ट 2019 

इतर दिनविशेष : 

1) 1862 - मुंबई  हायकोर्टचे उदघाटन. 

2) 1893 - वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू ऑस्कर चार्ल्स स्कॉट याचा जन्म. 

3) 1911 - वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी यांचा जन्म. 

4) 1945 - दुसरे महायुद्ध संपले.

5) 1947 - हिंदुस्थानची फाळणी, जगाच्या नकाशात पाकिस्तानची भर.  

अवश्य वाचा